शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती भवनाच्या तत्परतेने नियोजित विवाह झाला सुकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 06:09 IST

पूर्वनियोजित विवाहाच्या कार्यक्रमात व्यत्यय येणार असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याची तत्परतेने दखल घेत राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात थोडा बदल केल्याने हा विवाह आता ठरल्याप्रमाणे पार पडू शकणार आहे.

थिरुवनंतपूरम : नौदलाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कोची दौऱ्यामुळे त्या शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात होणा-या एका विदेशी दाम्पत्याच्या पूर्वनियोजित विवाहाच्या कार्यक्रमात व्यत्यय येणार असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याची तत्परतेने दखल घेत राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात थोडा बदल केल्याने हा विवाह आता ठरल्याप्रमाणे पार पडू शकणार आहे.कोची येथील ‘ताज विवांता’ या हॉटेलात विवाह करण्यासाठी मुद्दाम अमेरिकेहून आलेल्या अ‍ॅश्ले हॉल आणि राष्ट्रपती भवन यांनी गेल्या दोन दिवसांत परस्परांना उद्देशून केलेल्या टिष्ट्वट््सवरून हा हृदयस्पर्शी घटनाक्रम समोर आला आहे. राष्ट्रपती भवनाने रविवारी रात्री केलेल्या शेवटच्या टिष्ट्वटमध्ये, ‘तुमची अडचण दूर झाल्याने आनंद झाला’ असे हॉल यांना कळवत असताना राष्ट्रपती कोविंद यांच्यावतीने त्यांना विवाहानिमित्त शुभेच्छाही दिल्या.अ‍ॅश्ले हॉल यांनी कोची येथील या हॉटेलात विवाह करण्याची आठ महिन्यांपासून तयारी केली होती. हा विवाह उद्या (मंगळवारी) सायंकाळी व्हायचा आहे. त्यासाठी त्या आणि त्यांचे ‘वºहाड’ ठरल्याप्रमाणे शनिवारी ‘ताज विवांता’ हॉटेलमध्ये पोहोचले. परंतु त्यांचा मोठा हिरमोड झाला. कारण, राष्ट्रपती कोविंद यांचाही कोची दौरा ठरला असून तेही विवाहाच्या दिवशी त्याच हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने गैरसोय होईल. त्यामुळे तुम्ही दुसरीकडे कुठेतरी सोय केल्यास बरे होईल, असे हॉटेल व्यवस्थापनाने अ‍ॅश्ले हॉल यांना सांगितले.जेमतेम ४८ तासांच्या अवधीत विवाहाची व्यवस्था दुसरीकडे कशी करायची या विवंचनेने हताश झालेल्या अ‍ॅश्ले हॉल यांनी आपली अडचण टिष्ट्वटरवर व्यक्त केली. एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी हिच अडचण मांडून शक्य असल्यास काही मदत करावी, असे टिष्ट्वट राष्ट्रपती भवनास उद्देशून केले. सुरुवातीस राष्ट्रपती भवनाकडून त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु अडचण दूर झाल्याचे हॉटेलकडून त्यांना सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)>आता सारे ठरल्याप्रमाणेराष्ट्रपती सोमवारी दुपारी कोचीमध्ये येऊन मंगळवारी सायंकाळी परत जाणार होते. या दोन दिवसांत सुरक्षा व्यवस्था असेल, अशी अडचण हॉटेल व्यवस्थापनाने सांगितली होती. परंतु हॉल यांच्या टिष्ट्वटची दखल घेऊन राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात थोडा बदल केला.त्यानुसार राष्ट्रपती आता मंगळवारी सकाळीच कोचीहून रवाना होतील व त्यानंतर हॉल यांचा विवाह ठरल्याप्रमाणे थाटात पार पडू शकेल.