शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारित युवतीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 04:17 IST

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या युवतीच्या वडिलांना पोलिसांनी रविवारी अटक केली होती.

लखनौ : उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या युवतीच्या वडिलांना पोलिसांनी रविवारी अटक केली होती.त्यांचा पोलीस कोठडीत असताना, सोमवारी सकाळी संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी भाजपा आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या युवतीच्या वडिलांना पोलीस कोठडीत पोटात दुखायला लागले व उलटीही झाली. त्यामुळे रविवारी रात्री त्यांना पोलिसांनी उन्नाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. वडिलांच्या मृत्यूमुळे आता या सर्व प्रकरणाला वेगळे वळण लागणार आहे. त्यांना कोठडीत पोलिसांनी बेदम मारहाण असल्याचा संशय आहे. ज्या आमदारावर बलात्काराचा आरोप आहे, त्याच्या भावाच्या सांगण्यावरून पोलिसांनी वडिलांना मारहाण केली, असा नातेवाइकांचा आरोप आहे. त्या प्रकरणी चौकशी सुरू केल्याचे उनावच्या पोलीस अधीक्षक पुष्पांजली देवी यांनी सांगितले.सेनेगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाºया युवती व तिच्या घरातील काही महिलांनी रविवारी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला होता. त्या वेळी तिच्या कुटुंबातील काही मंडळींनीही निदर्शने केली होती. या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती. सेनगर यांना मात्र हे आरोप मान्य नाहीत. आपल्या राजकीय विरोधकांनी रचलेले हे कारस्थान आहे, असा त्यांचा दावा आहे. (वृत्तसंस्था)>संरक्षण देण्याची युवतीची मागणीसेनगर यांनी आपल्यावर बलात्कार केला असून त्यांना अटक करा, अशी मागणी या युवतीने एका पत्रकार परिषदेत केली होती. अन्यथा स्वत:ला संपविण्याचा इशारा तिने दिला होता. बलात्कार प्रकरणी कोणाला काही सांगितलेस, तर तुझ्या कुटुंबीयांना ठार मारू, अशी धमकीही आपल्याला देण्यात आल्याचा दावा तिने केला होता. पोलीस कोठडीत असताना वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आता आपल्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी आता या युवतीने केली आहे.