शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

आई कामावर गेल्यानंतर बाप करायचा मुलींवर बलात्कार

By admin | Updated: February 21, 2017 09:38 IST

बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीवर स्वतःच्या पोटच्या मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 21 - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कृष्णानगरमधील इंद्रापुरी परिसरात राहणा-या एका व्यक्तीवर स्वतःच्या पोटच्या मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आशा ज्योती केंद्रामध्ये मुलींचे समुपदेशन केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी पिताला ताब्यात घेतले आहे.
 
आशा ज्योती केंद्रातील काउंसलर अर्चना सिंह आणि पोलीस अधिकारी मालती सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी खासगी कंपनीत कामाला आहे. ती नोकरीवर गेल्यानंतर आरोपी दारू पिऊन घरी यायचा आणि यानंतर मोठ्या मुलीवर (वय 15 वर्ष) लैंगिक अत्याचार करायचा. मुलीने विरोध केला तर तिला मारहाण करायचा आणि जीवे मारण्याची धमकीही द्यायचा. 
 
नराधम बाप गेल्या 5 महिन्यांपासून मोठ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीने दारूच्या नशेत छोट्या मुलीवर बलात्कार केला. हे पाहिल्यानंतर मोठ्या मुलीचा इतक्या दिवसांचा संयम तुटला आणि तिने नराधम बापाच्या कुकृत्याची माहिती आईला दिली.
 
धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पीडित मुलींच्या आईचे नराधम पतीसोबत भांडण झाले. कृष्णानगर पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी सुजीत द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीनं विरोध केल्यानंतर आरोपीने तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. 
 
त्याचा जाचातून कसातरी स्वतःचा जीव वाचवत महिलेनं पतीविरोधात पोलिसात आणि आशा ज्योती केंद्रात तक्रार दाखल केली. प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन आशा ज्योती केंद्र आणि पोलिसांनी तातडीने पीडित मुलींचे समुपदेशन केले. घडलेला सर्व प्रकार दोघींनी संस्थेकडे सांगितला. यानंतर तपासणीसाठी मुलींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अहवाल आल्यानंतर कृष्णानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे.