शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
5
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
6
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
7
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
8
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
9
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
10
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
12
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
13
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
14
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
15
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
16
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
17
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
18
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
19
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
20
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट

‘त्या’ अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

By admin | Updated: July 12, 2015 23:17 IST

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमिताभ

लखनौ : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांच्याविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री यादव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर काही तासांच्या आतच त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा हा गुन्हा दाखल करण्यात आला, हे विशेष.पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असलेले ठाकूर यांच्याविरुद्ध पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार), ५०४ (हेतुपुरस्सर अवमान) आणि ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. गाझियाबादच्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी दाखल केलेल्या तक्रारीवरून ठाकूर यांच्याविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गोमतीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख सईद मोहम्मद अब्बास यांनी दिली. ठाकूर यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या नूतन ठाकूर यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी बनविण्यात आले आहे, असे अब्बास यांनी सांगितले.नूतन या नोव्हेंबर २०१४ मध्ये गाझियाबादला गेल्या होत्या. तेथे त्यांनी तक्रारकर्त्या महिलेला नोकरीचे आश्वासन देऊन लखनौला आपल्या घरी बोलावून घेतले होते. ३१ डिसेंबर रोजी नूतन यांनी महिलेला ठाकूर यांच्या खोलीत मुलाखतीसाठी जाण्यास सांगितले आणि तेथे गेल्यावर ठाकूर यांनी आपल्यावर बलात्कार केला, अशी तक्रार या महिलेने केली असल्याची माहिती अब्बास यांनी दिली. दरम्यान, हा एफआयआर निराधार असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. आपण मुलायमसिंग यांनी दिलेल्या धमकीचा पर्दाफाश केला आणि सपाप्रमुखाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करून ही धमकी सार्वजनिक केली. त्याची मुलायमसिंग यांनी अशी ‘पतरफेड’ केली आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)