शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'बलात्कारांच्या बातम्यांना जास्त प्रसिद्धी दिली जातेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 15:27 IST

भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांचं विधान

मथुरा: आज काल बलात्कारांच्या बातम्यांना जास्त प्रसिद्धी दिली जात आहे, असं भाजपाच्या खासदार  हेमा मालिनी यांना म्हटलं आहे. 'आधीही बलात्कार होत असतील. माहित नाही. मात्र आता त्याबद्दलच्या घटनांना जास्त प्रसिद्धी मिळत आहे,' असं मथुरा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार असलेल्या हेमा मालिनी म्हणाल्या. 'बलात्कारासारख्या घटना देशात घडायला नकोत. त्यामुळे देशाची प्रतिमा डागाळते,' असं हेमा मालिनी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हटलं. कथुआ आणि उन्नव बलात्कार प्रकरणांमुळे देशातलं वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. या प्रकरणांमधील दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरांमधून करण्यात येतं आहे. कथुआ आणि उन्नवसारख्या घटना देशातील इतर भागांमध्येही घडत असल्यानं याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. कथुआ प्रकरणात आठ वर्षांच्या मुलीवर अतिशय पाशवी अत्याचार करण्यात आले होते. यानंतर पीडित मुलीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा मागणी करण्याच्या मागणीनं जोर धरला. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळानं आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी केंद्र सरकारनं पॉक्सो कायद्यात बदल केला आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारHema Maliniहेमा मालिनी