मामाकडून अल्पवयीन भाचीवर बलात्कार
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
संशयिताला अटक : कातवण येथील घटनेने खळबळ
मामाकडून अल्पवयीन भाचीवर बलात्कार
संशयिताला अटक : कातवण येथील घटनेने खळबळपुरळ : देवगड तालुक्यातील कातवण गावातील मामानेच अल्पवयीन भाचीवर बलात्कार केला आहे. देवगड पोलिसांनी याप्रकरणी संशयिताला अटक केली आहे.देवगड तालुक्यातील कातवण येथील पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मामाकडे आजोळी ९ सप्टेंबर ते २७ जानेवारी २०१५ दरम्यानच्या कालावधीत राहण्यासाठी आली होती. मामाकडे राहत असतानाच या पीडित मुलीच्या मामाने तिच्यावर वारंवार जबरी बलात्कार केला. तसेच ही गोष्ट घरात कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.आजोळी राहिल्यानंतर ही मुलगी जानेवारी २०१५ अखेर आपल्या राहत्या ठिकाणी आई-वडिलांकडे मुंबई येथे गेली होती. ती मुंबईत गेल्यावर अचानक आजारी पडल्यामुळे तत्काळ आई-वडिलांनी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले.या प्रकाराने जबरदस्त हादरा बसलेल्या मुलीच्या आई-वडिलांनी त्या मुलीकडे विचारणा केली असता सत्य समोर आले. मुलीने आई-वडिलांना आपल्या मामानेच आजोळी असताना वारंवार बलात्कार केल्याचे सांगितले.या घटनेने सुन्न झालेल्या त्या मुलीच्या आई-वडिलांनी मुंबई येथील टिळकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ही घटना देवगड तालुक्यात घडल्यामुळे टिळकनगर पोलिसांनी देवगड पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार शून्य नंबरने पाठविली. यावरून देवगड पोलिसांनी मुलीच्या मामाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरिक्षक माधुरी पाटे करीत आहेत. (वार्ताहर)