शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आप आमदारावर बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 10:16 IST

पिडीत महिलेने केलेल्या आरोपांनुसार आपचे रिठालाचे आमदार महेंद्र गोयल यांनी दोन वर्षांपूर्वी बलात्कार केला होता.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आम आदमी पार्टी तयारी करण्यात गुंतली असताना दिल्लीचे  आमदारासह त्यांच्या भावावर एका महिलेने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पिडीतेने प्रशांत विहार पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नसली तरीही आपवर टीकेची झोड उठली आहे. 

पिडीत महिलेने केलेल्या आरोपांनुसार आपचे रिठालाचे आमदार महेंद्र गोयल यांनी दोन वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. बुधवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार महेंद्र गोयल आपल्याला ओळखत असल्याचे तिने म्हटले आहे. यावर भाजपाचे महासचिव कुलजीत चहल यांनी ट्विट करून गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली होती. 

गोयल यांनी या महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिला धमक्या दिल्या आहेत. तिची आक्षेपार्ह चित्रफित व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. रोहिणी क्षेत्रामध्ये राहणारी ही महिला आमदाराकडे मदत मागण्यासाठी गेली होती. 10 वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. आर्थिक अडचम भासल्याने दोन वर्षांपूर्वी ही महिला विधवा पेन्शन योजनेसाठी आमदाराच्या घरी गेली होती. यावेळी आमदाराने तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. यानंतर कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती. तसेच तिचा मोबाईलही काढून घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे.

दोन वर्षानंतर गेल्या महिन्यात 5 फेब्रुवारीला महेंद्र गोयल यांचा भाऊ ईश्वर याने तिला अश्लिल व्हिडीओ पाठविले आणि संदेशही पाठविले. तसेच त्याच्यासोबत शारिरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी गोयल यांनी महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला. ही महिला लोकांकडून पैसे घेते आणि परत करत नाही. याबाबत तिच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सांगितले की, तपास सुरु असून यानंतरच कारवाई केली जाईल. आमदाराविरोधात भादंवि 376, 506 आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ऑगस्ट 2016 मध्येही आपचे माजी मंत्री आणि आमदार संदीप कुमार सीडी स्कँडलमध्ये अडकले आहेत. या सीडी स्कँडलमध्ये कुमार महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळले होते. यानंतर केजरीवाल यांनी त्यांना मंत्रीपदावरून हटविले होते.

टॅग्स :Rapeबलात्कारdelhiदिल्ली