शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

'लालू प्रसाद यादवांची तब्येत कधीही बिघडू शकते', RIMS च्या डॉक्टरांनी सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 22:29 IST

lalu prasad yadav : राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डॉक्टरांनी लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीविषयी मोठे विधान केले आहे.

ठळक मुद्देलालू प्रसाद यादव यांना गेल्या महिन्यात राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते.

नवी दिल्ली : चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डॉक्टरांनी लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीविषयी मोठे विधान केले आहे. लालू प्रसाद यादव यांची तब्येत कधीही बिघडू शकते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

लालू प्रसाद यादव यांच्यावर डॉ. उमेश प्रसाद हे उपचार करत आहेत. लालू प्रसाद यादव किडनी काम करणे कधीही थांबवू शकते. त्याचा अंदाज करणे कठीण आहे. लालू यादव यांची किडनी फक्त २५ टक्केच काम करत आहे, असे डॉ. उमेश प्रसाद यांनी म्हटले आहे. तसेच, यासंदर्भात उच्च अधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात कळविले आहे असून लालू प्रसाद यादव यांची प्रकृती नाजूक बनली आहे, असेही डॉक्टर उमेश प्रसाद यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लालू प्रसाद यादव यांना गेल्या महिन्यात राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. बिहार निवडणूक निकालानंतर लालू प्रसाद यादव हे भाजपा आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणी एक ऑडिओही समोर आला होता, असा आरोप भाजपाने केला होता. मात्र, आरजेडीने हे आरोप फेटाळून लावले. 

सुशील कुमार मोदींनी केला होता आरोप बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांच्या आरोपानंतर बिहारचे राजकारण ढवळून निघाले. सुशील कुमार मोदी यांनी आरोप केला होता की, लालू प्रसाद यादव हे रांचीमधील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या बंगल्यातूनच NDAच्या आमदारांना प्रलोभन देत होते आणि नितीश कुमारांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. भाजपाने लालूंचा आणि आमदार ललन पासवान यांच्या संवादाचा ऑडिओदेखील जारी केला होता. 

सहा आठवड्यांनंतर सुनावणीलालू प्रसाद यादव यांना तुरुंगातून बाहेर येण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. झारखंड हायकोर्टात चारा घोटाळा प्रकरणी सुनावणी झाली. यात लालूंच्या वकिलांनी न्यायालयाकडून ६ आठवड्यांची मुदत मागितली आहे. कोर्टाने त्यांना मंजुरी दिली आहे. म्हणजेच लालू यादव यांच्या जामिनावर आता ६ आठवड्यांनंतरच सुनावणी होईल. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवhospitalहॉस्पिटलRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल