शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
2
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
3
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
4
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
5
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
6
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
7
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
8
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
9
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
10
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
11
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
12
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
13
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
14
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
15
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
16
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
17
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
18
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
19
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
20
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?

हृदयस्पर्शी! इस्रायल-हमास युद्धात अडकली 'झारखंडची लेक'; आई-वडिलांना काळजी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 14:47 IST

Israel Palestine Conflict : रांची येथील विनिता घोष ही तरुणी इस्रायल-हमास युद्धात अडकल्याने तिचं कुटुंब काळजीत आहे. आपल्या मुलीच्या सुखरूप परतण्यासाठी पालक नेत्यांकडे जात आहेत.

झारखंडच्या रांची येथील विनिता घोष ही तरुणी इस्रायल-हमास युद्धात अडकल्याने तिचं कुटुंब काळजीत आहे. आपल्या मुलीच्या सुखरूप परतण्यासाठी पालक नेत्यांकडे जात आहेत. दुसरीकडे इस्रायलचे लोक विनीताला खूप मदत करत आहेत आणि त्यांनी तिथून भारतात येण्यासाठी तिची तिकिटाचीही व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर इस्रायलमध्ये अडकलेल्या 18 हजार भारतीयांची सुखरूप सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन अजय सुरू केल्याची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

विनिता तेल अवीवमध्ये असून सध्या ती तिथे सुरक्षित आहे. मात्र, तरीही रोज सकाळ-संध्याकाळ हल्ले होत असल्याचे विनीता सांगते. तेल अवीववर क्षेपणास्त्रे आणि रॉकेट डागले जात असल्याने सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. विनीता सांगते की, इस्रायलचे लोक मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत. विनिता तेल अवीव विद्यापीठात पीएचडी करत आहे. रांचीमध्ये राहणारे तिचे आई-वडील आपली मुलगी युद्धात अडकल्यामुळे खूप चिंतेत आहेत. तेथून मुलीला सुखरूप बाहेर काढता यावे, यासाठी वडील विश्वजित घोष नेत्यांकडे जात आहेत. 

विश्वजित घोष यांनी सांगितलं की, ती 2022 मध्ये पीएचडी करण्यासाठी इस्रायलला गेली होती. तिला अजून अभ्यास पूर्ण करायचा आहे, पण युद्धासारखी परिस्थिती लक्षात घेऊन ती तिथून येत आहे. तथापि, भारत सरकार देखील इस्रायलमधून लोकांना एअरलिफ्ट करण्यास सुरुवात करत आहे, परंतु विनीताचे तिकीट आधीच बुक केले गेले आहे आणि 13 ऑक्टोबर रोजी ती इस्रायलहून दुबईसाठी रवाना होईल आणि नंतर भारतात पोहोचेल. इस्रायलच्या लोकांनी विनीता यांना याबाबत खूप मदत केली.

विनीताची आई आपल्या मुलीचा फोटो बघताना दिसली, पण मुलीचा फोटो पाहताना त्यांचे डोळे भरून आले. आईची एकच इच्छा आहे ती म्हणजे आपली मुलगी सुखरूप घरी यावी. विनीता घोषने फोनवर बोलचताना इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाविषयी आणि इस्रायलच्या लोकांबद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. इस्रायलचे लोक मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत. अशा परिस्थितीतही लोक आपलं काम चोखपणे पार पाडत आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल