शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

रामनाथ कोविंद यांचा विजय सहज शक्य!

By admin | Updated: June 21, 2017 03:27 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण दिसत आहे.

हरिष गुप्ता/शीलेश शर्मा लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना निवडून येण्यात अडचणी दिसत नसतानाच, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण दिसत आहे. या दोन्ही नेत्यांनी दलित उमेदवार असलेल्या कोविंद यांच्याविषयी अनुकूल मत व्यक्त केल्यामुळे, विरोधी मतांमध्ये फूट पडण्याची शंका काँग्रेसला वाटत आहे.भाजपाच्या गोटात मात्र, विजयाची खात्री आहे. रालोआतील शिवसेनेसह सर्व घटक पक्ष कोविंद यांना मतदान करतील, हे निश्चित झाले आहे. केंद्रात सत्तेत नसलेले, पण राज्यांत भाजपासमवेत असलेले पक्षही कोविंद यांनाच मते देतील, असा दावा आहे. त्यातच वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रीय समिती ही दक्षिणेकडील पक्ष व बिजू जनता दल या पक्षांचा पाठिंबा लक्षात घेता कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अण्णा द्रमुकही त्याच वाटेने जाऊ शकेल. राजद, जनता दल (यू), लोक दल, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्या भूमिका स्पष्ट नसल्या, तरी यापैकी काही पक्ष कोविंद यांनाच मते देतील, अशी भाजपा नेत्यांना खात्री आहे.राष्ट्रपतिपदी निवडून येण्यास ५ लाख ४९ हजार ४४२ इतक्या मूल्याची मते मिळणे आवश्यक असून, शिवसेना वगळता भाजपाकडे ५ लाख ६ हजार ८३४ किमतीची मते आहेत. शिवसेनेच्या मतांची संख्या २५ हजारांहून अधिक असून, तीही कोविंद यांनाच पडणार आहेत. या वेळी दक्षिणेकडील चार मोठे पक्ष भाजपासमवेत जातील, असे दिसत आहे. त्यामुळे साडेपाच लाख किमतीची मते मिळवणे कोविंद यांना सहज शक्य मानले जात आहे.दुसरीकडे विरोधात असलेल्या नितीशकुमार व मायावती यांची भूमिका काँग्रेसला अडचणीची वाटत आहे. दोन नेत्यांच्या भूमिकेनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी पक्षाच्या नेत्यांशी विचारविनिमय केला. त्यानंतर, नितीशकुमार यांना भेटण्यासाठी गुलाम नबी आझाद बिहारकडे रवाना झाले. मायावती यांच्याशीही काँग्रेस नेते चर्चा करतील, असे दिसते. त्याचबरोबर, डावे व अन्य विरोधी पक्ष यांच्याशीही काँग्रेसतर्फे संपर्क सुरू आहे. भाजपाने दलित उमेदवार दिला असताना विरोधकांमध्ये फूट असल्याचे दिसू नये, यासाठी काँग्रेसतर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहे. दलित उमेदवारालाविरोध करणे नितीशकुमार व मायावती यांना अवघड जाणार आहे. त्यामुळे आपणही दलित उमेदवार द्यावा का, याबाबत काँग्रेस नेते आपापसात व अन्य पक्षांशी चर्चा करीत आहेत. त्यात मीरा कुमार व सुशीलकुमार शिंदे यांची नावे पुढे आली आहेत. देशातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एम. एस. स्वामीनाथन यांचे नावही अचानक चर्चेत आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही याआधी स्वामीनाथन यांचे नाव पुढे केले होते, हे विशेष. सर्व विरोधी नेत्यांची बैठक २२ जूनला होणार आहे. त्याआधी वा त्यावेळी उमेदवाराच्या नावावर एकमत व्हावे, असा प्रयत्न सुरू आहे. डाव्या पक्षांनी गोपाळकृष्ण गांधी यांचे नाव सुचविले आहे. ते राज्यपाल होते. अर्थात या निवडणुकीत विजय होतो की पराभव हे महत्त्वाचे नसून, ही दोन विचारप्रणालींमधील लढाई आहे, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांनी स्पष्ट केले आहे.राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर, रामनाथ कोविंद यांनी सोमवारी बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजीनामा मंजूर केला असून, प. बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. गरज भासल्यास १७ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी पूर्ण होत आहे.