शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

रामनाथ कोविंद नवे राष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 04:14 IST

भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाप्रणित रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचीच गुरुवारी निवड झाली आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाप्रणित रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचीच गुरुवारी निवड झाली आहे. रामनाथ कोविंद यांना ७ लाख २ हजार ४४ (६५.६५ टक्के) मते तर काँग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांना ३ लाख ६७ हजार ३१४ (३५.३४ टक्के) मते मिळाली. कोविंद यांनी मीराकुमार यांचा ३ लाख ३४ हजार म्हणजे जवळपास दुप्पट मतांनी पराभव केला. रामनाथ कोविंद यांच्या रूपाने राष्ट्रपतिपदी प्रथमच भाजपचा नेता विराजमान होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविंद्र यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व पराभूत उमेदवार मीरा कुमार यांनीही कोविंद यांचे अभिनंदन केले.कोविंद यांना ५२२ संसद सदस्यांनी तर मीराकुमार यांना २२५ संसद सदस्यांनी मतदान केले आणि २१ संसद सदस्यांची मते बाद झाल्याचे सर्वप्रथम आंध्रप्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश व बिहारचा समावेश होता. कोविंद यांना मतमूल्यानुसार आंध्र प्रदेशात २७ हजार १८९ मते, अरुणाचल प्रदेशात ४४८, आसाममधे १0,५५६ मते मिळाली. बिहारमधून मीराकुमारांना चांगली मते पडली, पण कोविंद यांनी तिथेही आघाडी मिळवली. बिहारमधे कोविंद यांना २२ हजार ४९0 तर मीराकुमार यांना १८ हजार ८६७ मते प्राप्त झाली.या ४ राज्यांखेरीज गोवा, गुजराथ, हरयाणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगड, हिमाचल, जम्मू काश्मिर, झारखंड, आदी राज्यातही मीराकुमारांच्या तुलनेत कोविंद यांचे मताधिक्य अधिक होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवाराला मिळणारा पाठिंबा लक्षात घेतला तर कोविंद निवडणूक जिंकणार हे सुरूवातीपासूनच निश्चित होते. निवडणूक अधिकारी अनुप मिश्रा यांनी या निकालाची औपचारिक घोषणा मतमोजणीनंतर सायंकाळी ५ वाजता केली. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांचा कार्यकाल २४ जुलैच्या मध्यरात्री संपत आहे. त्यानंतर दिल्लीच्या राजाजी मार्गावर नव्या निवासस्थानी राहायला जातील. २५ जुलै रोजी सकाळी रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदासाठी शपथविधी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले सारे सदस्य यावेळी उपस्थित असतील व नव्या कारकीर्दीसाठी कोविंद यांना शुभेच्छा देतील. भाजपाच्या दृष्टीने त्यांचा राष्ट्रपती होणे, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यांच्या विजयासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक विरोधी नेत्यांशी बोलले होते. नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल तसेच अण्णा द्रमुकचे दोन्ही गट आणि वायएसआर काँग्रेस व तेलंगणा राष्ट्रीय समिती यांची मते रामनाथ कोविंद यांच्याकडे वळविण्यात नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा होता. पक्षाध्यक्ष अमित शहा हेही अनेक पक्षांच्या नेत्यांच्या सातत्याने संपर्कात होते. कोविंद यांना काहीही करून ६0 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळावीत, असा भाजपाचा प्रयत्न होता आणि त्यात त्यांना यशही मिळाले.कच्च्या घराची आठवणनिवडणूक जिंकल्यावर रामनाथ कोविंद पत्रकारांंना म्हणाले, ‘माझ्या आयुष्यातला हा भावनाप्रधान क्षण आहे. देशाचे राष्ट्रपतीपद माझ्याकडे सोपवले जाईल, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती, कारण ते माझे कधीही लक्ष्य नव्हते. देशातल्या सर्व लोकप्रतिनिधींना मी धन्यवाद देतो आणि साऱ्या देशवासियांना वंदन करीत देश सेवेचा संकल्प करतो’. विजयानंतर कोविंद यांनी मीराकुमार यांनाही शुभेच्छा दिल्या. ते विजयी झाल्याची घोषणा झाली, तेव्हा दिल्लीत पाऊ स पडत होता. त्यामुळे कोविंद यांना आपल्या खेडेगावातील कच्च्या घराची आठवण झाली. ते म्हणाले की आजही देशातील गरीब वर्ग कच्च्या घरातच राहतो. त्याचे राहणीमान सुधारणे आवश्यक आहे. भाजपा कार्यालयात जल्लोषसकाळी मतदान सुरू झाले, तेव्हापासूनच भाजपाच्या ११ अशोका रोड या मुख्यालयात उत्साहाचे वातावरण होते. मतमोजणी पूर्ण होण्याआधीच नेते व कार्यकर्ते एकमेकांचे अभिनंदन करीत होते. संध्याकाळी निकाल जाहीर होताच, तिथे आनंदाला उधाणच आले.तिघे संघाशी संबंधित...कोविंद हे राष्ट्रपती होणारे पहिलेच भाजपचे व संघ विचारांचे नेते असून, त्यांच्या विजयामुळे सत्ताधारी भाजपाला आपला राजकीय अजेंडा राबविणे सोपे होणार आहे. दलित समाजातून आलेले कोविंद यांना राष्ट्रपती करून, त्या समाजाला जवळ आणण्याचा प्रयत्नही भाजपतर्फे पुढील निवडणुकांत केल्याशिवाय राहणार नाही. देशात प्रथमच पंतप्रधान, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असतील. उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक पुढील महिन्यात होत असून, त्यातही व्यंकय्या नायडू यांचा विजय सहज मानला जात आहे.दोन विचारसरणीतली वैचारिक लढाई होती, जी अत्यंत निष्ठापूर्वक मी लढवली. निवडणूक प्रचारात आदर्श परंपरांचे व साऱ्या मर्यादांचे कसोशीने मी पालन केले, याचे मला समाधान आहे. पराभूत झाल्याचे मला अजिबात दु:ख नाही. मीरा कुमार यांनी पराभूत होऊ नही त्यांना भेटावयास गेलेल्यांना मिठाई दिली. असे मी नेहमीच करीत असते, असे त्या म्हणाल्या.असे झाले मतदान...आताच्या निवडणुकीत ७७६ संसद सदस्यांपैकी  771 मतदानासाठी पात्र होते. (चार जागा रिकाम्या व एक सदस्य अपात्र ) त्यापैकी ७६८ संसद सदस्यांनी मतदान केले. (९९.६१%). त्यांच्या मतांचे मूल्य ५,४३, ७४४ एवढे होते.एकूण ४,१२० विधानसभा सदस्यांपैकी ४,१०९ सदस्य मतदान करण्यास पात्र होते. (१० जागा रिकाम्या व एक अपात्र). प्रत्यक्षात ४,०८३ (९९.३७ टक्के) विधानसभा सदस्यांनी मतदान केले. त्यांच्या मताचे मूल्य ५,२५,६१४ होते.अशा प्रकारे या मतदानाचे एकूण मतमूल्य १०,६९,३५८एवढे होते.यापैकी ५२२ संसद सदस्यांची व २,९३० आमदारांची मते कोविंद यांना मिळाली. तर मीरा कुमार यांना २२५ संसद सदस्यांनी व १,८४४ विधानसभा सदस्यांनी मतदान केले. एकूण मतमूल्यापैकी ७.०२,०४४ एवढ्या मूल्याची म्हणजे ६५.६५% कोविंद यांनी मिळाली. मीरा कुमार यांना मिळालेल्या मतांचे मूल्य ३,६७, ३१४ म्हणजे ३४.३५ टक्के होते.- बहुसंख्य मूल्याची मते रामनाथ कोविंद यांना मिळाल्याने ते विजयी झाल्याचे जाहीर केले गेले.