शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिरासाठी कायदा अशक्य!

By admin | Updated: May 11, 2015 06:36 IST

राज्यसभेत सरकारचे बहुमत नसणे ही अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव आणणे आणि कायदा करण्याच्या भाजपाच्या मार्गातील मोठी बाधा आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

अयोध्या : राज्यसभेत सरकारचे बहुमत नसणे ही अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव आणणे आणि कायदा करण्याच्या भाजपाच्या मार्गातील मोठी बाधा आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राममंदिर बांधण्याबाबतचा केंद्र सरकारचा नाइलाज रविवारी प्रथमच जाहीर केला.भाजपाने मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत जारी केलेल्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात अयोध्या येथे राममंदिर बांधण्यासह जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करणे आणि समान नागरी कायदा बनविण्याचे आश्वासन दिले होते. ‘भाजपाकडे राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे राममंदिर बांधण्यासाठी संसदेमध्ये प्रस्ताव आणणे आणि त्याचे कायद्यात रूपांतर करणे या वेळी शक्य होणार नाही. कायदा करण्यासाठी सरकारकडे बहुमत नाही. हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे आणि राममंदिर बांधण्यासाठी सरकार न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करेल,’ असे राजनाथसिंह म्हणाले.विहिंप नेते नृत्यगोपाल दास यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी राजनाथसिंह अयोध्या येथे आले होते. त्यांनी अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी परिसरालाही भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘येत्या काही दिवसांत भाजपाला राज्यसभेत बहुमत मिळाले तर भाजपा अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी प्रस्ताव आणणार काय, असा प्रश्न राजनाथसिंह यांना विचारण्यात आला. त्याला थेट उत्तर न देता; ‘हा काल्पनिक प्रश्न आहे’, असे ते म्हणाले.२४३ सदस्यीय राज्यसभेत सत्तारूढ भाजपाचे ४५ सदस्य आहेत, तर विरोधी पक्षांकडे १३२ सदस्य आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात राजनाथसिंह म्हणाले, येत्या एक-दोन दिवसांत आपण संसदेत दाऊदबद्दल निवेदन देणार आहोत.(वृत्तसंस्था)-----------नक्षलवादावर सरकार गंभीरदाऊदच्या ठावठिकाण्याबद्दल संसदेत देण्यात आलेल्या परस्पर विसंगत उत्तरामुळे मोदी सरकारची फजिती झाली होती. त्यानंतर दाऊद हा पाकिस्तानातच असल्याचे गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले होते. नक्षलवादाबद्दल राजनाथसिंह म्हणाले, नक्षलवादाची समस्या सोडविण्यासाठी सरकार गंभीर आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे रॅली घेतली आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.