शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

32 पायऱ्या चढून होणार रामललाचे दर्शन, तळमजल्याचे 70 टक्के काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 06:03 IST

मंदिरात चढण्यासाठी २४ पायऱ्या करण्यात आल्या आहेत. मंदिरातील ३२ पायऱ्या चढून भाविक रामललाचे दर्शन घेऊ शकतील.

अयोध्या : श्री रामजन्मभूमीत राम मंदिर उभारणीचे काम सध्या जोरात सुरू आहे. राम मंदिराच्या तळमजल्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात खांब उभारण्यात आले आहेत. मंदिरात चढण्यासाठी २४ पायऱ्या करण्यात आल्या आहेत. मंदिरातील ३२ पायऱ्या चढून भाविक रामललाचे दर्शन घेऊ शकतील.

भिंतींसाठी मकरानाचे पांढरे संगमरवरी खांबराम मंदिराचे रूप आता दुरूनच दिसण्यास सुरुवात झाली आहे. राम मंदिराच्या गर्भगृहाच्या तीन बाजूंच्या भिंतींचे काम पूर्ण झाले आहे. या २० फूट उंच भिंतींसाठी मकरानाचे पांढरे संगमरवरी खांब बसवण्यात आले आहेत. जानेवारी २०२४च्या तिसऱ्या आठवड्यात मंदिराचे काम पूर्ण होईल, अशी अशा आहे.

२०० बीमचे कोरीव काम पूर्ण राम मंदिराच्या छताच्या सुमारे दोनशे बीमचे कोरीव काम पूर्ण झाले आहे. रामसेवकपुरम आणि रामघाट येथे असलेल्या कार्यशाळेत हे काम करण्यात आले. कोरलेले दगड रामजन्मभूमी संकुलात नेले जात आहेत.

मोदी करतील रामललाची स्थापना जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात राम मंदिरात रामलला त्यांच्या मूळ जागेवर विराजमान होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामललाला आपल्या स्थानावर विराजमान करतील, असे सुत्रांनी सांगितले.

डिसेंबरमध्ये सुरू होणार उद्घाटन सोहळाट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, जानेवारी २०२४च्या तिसऱ्या आठवड्यात राम मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल. राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा डिसेंबर २०२३ मध्येच सुरू होईल. ऑगस्ट २०२०मध्ये राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर प्रथमच अयोध्या शहरात भव्य रामनवमी उत्सवाचे नियोजन सुरू आहे.

सर्व कामे वेळेत होतीलश्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, गर्भगृहाचे बीम घालण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. मंदिराच्या उभारणीचे काम वेळेच्या अंतिम मुदतीनुसार सुरू आहे. दिलेल्या मुदतीत सर्व कामे पूर्ण होतील.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या