शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील 'त्या' जागेवर पूर्वी बौद्ध मंदिर होते – रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 12:34 IST

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

जयपूर - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ''अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते. यानंतर मुस्लिम आणि हिंदूंनी बौद्ध मंदिर पाडून तेथे राम मंदिर आणि बाबरी मशीद बांधली'', असे विधान आठवले केले आहे.  जयपूर येथील पिंक सिटी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले यांनी हे विधान केले आहे. या जागेवर खोदकाम केले तर तेथे बौद्ध मंदिराचे अवशेष सापडू शकतात, असेही आठवले म्हणाले.  दरम्यान, 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत  भाजपाला 300 हून अधिक जागा मिळतील, अशी भविष्यवाणीही त्यांनी यावेळेस केली आहे.

मला तर पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं - आठवलेएकीकडे दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असताना, महागाईची झळच बसत नसल्याचे विधान आठवले यांनी केले आहे. ''पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय आहेत, याने काहीही फरक पडत नाही. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल'', असे वक्तव्य रामदास आठवले यांनी शनिवारी जयपूर येथे केले. ''पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जनता होरपळतेय, ही बाबदेखील मान्य आहे.  इंधनाच्या वाढणाऱ्या किमती कमी करणं, हे सरकारचं कर्तव्य आहे'',असेही यावेळेस आठवले यांनी म्हटले. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. अशातच ''पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं असल्यानं महागाईची झळ बसतच नाही'',  असे विधान रामदास आठवले यांनी करुन सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याची टीका होऊ लागली आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरRamdas Athawaleरामदास आठवलेAyodhyaअयोध्या