शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

'मेरे पार्टी का मैं हू अकेला',  आठवलेंच्या कवितांनी सभागृहात एकच हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 19:52 IST

Ramdas Athawale : रामदास आठवले यांच्या भाषणादरम्यान नेहमीप्रमाणे हशा पिकला आणि त्यांच्या कवितेला उपस्थित खासदारांनीही चांगला प्रतिसाद दिला. 

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  (Ramdas Athavale) यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्या अभिनंदन आणि स्वागतपर भाषण केले. मंत्री नाही केलं म्हणून मी काँग्रेसची साथ सोडल्याचं सांगताना रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ही कवितेनेच केली. त्यांच्या भाषणादरम्यान नेहमीप्रमाणे हशा पिकला आणि रामदास आठवले यांच्या कवितेला उपस्थित खासदारांनीही चांगला प्रतिसाद दिला. 

रामदास आठवले म्हणाले, 

"आदरणीय महोदय,

मैं तो अन्याय के खिलाफ लढा हूँ,

इसलिए आपको बधाई देने के लिए खडा हूँ,

आपका अनुभव बहुतही बडा है,

इसलिए आपने संघर्ष का पहाड चढा है,

मेरे पार्टी का मैं हू अकेला,

लेकीन मेरे हाथ में है संविधान का पेला,

मैं तो हूँ आपका सच्चा चेला,

 मुझे मत छोडो अकेला.

जिन्होंने उपराष्ट्रपती का सर किया है गड,

उनका नाम है धनकड

हमें मिलकर उखाड देनी है विषमता की जड,

इसमें जरूर सफल होंगे आदरणीय धनकड

हाऊस में जो सदस्य करेंगे फॅक्शन,

उनके उपर होनी चाहिए कडी अॅक्शन

हमें तो मजबूत करना हैं भारत नेशन,

क्योंकी हंगामा करने की हमें नही चाहिए फॅशन”

दरम्यान, रामदास आठवले आपली कविता सादर करत असताना इतर खासदार त्यांना अधूनमधून दाद देत होते. याचबरोबर, रामदास आठवले पुढे म्हणाले, "तुम्ही मोठा संघर्ष करून याठिकाणी पोहोचला आहात, गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा ते इथपर्यंत तुम्ही उच्च पदापर्यंत आला आहात. तुमचा अनुभव आणि संघर्ष मोठा आहे. तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये काम करणं अवघड होतं. पण तुम्ही ते आव्हान लीलया पेललं. बंगालमध्ये तुम्ही चांगलं काम केलं म्हणूनच तुम्ही इथेपर्यंत पोहोचू शकला आहात. तिथे तुम्ही चांगलं काम केलं नसतं, तर कदाचित तुम्हाला हे पद मिळणं अवघड होतं."

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेParliamentसंसद