शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रामचरितमानस द्वेष पसरवाणारा ग्रंथ, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांची मुक्ताफळे, पुढे म्हणाले, या ग्रंथात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 23:20 IST

Ramcharitmanas: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे, असं विधान केलं आहे.

पाटणा - बिहारच्या शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे, असं विधान केलं आहे. पाटणामध्ये नालंदा मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी रामचरितमानस हा समाजात फूट पाडणारा ग्रंथ असल्याचे म्हटले आहे. आता चंद्रशेखर यांच्या या विधानानंतर राजकारणाला तोंड फुटले आहे.

या वक्तव्याबाबत त्यांना विचारले असता. त्यांनी रामचरितमानस बाबत आपण वापरलेले शब्द योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मनुस्मृतीमध्ये समाजातील ८५ टक्के लोकसंख्येच्या मोठ्या गटाविरोधात शिविगाळ करण्यात आली आहे. तसेच रामचरितमानसच्या उत्तरकांडामध्ये कनिष्ठ जातीचे लोक शिक्षण घेतल्यानंतर सापाप्रमाणे विषारी बनतात. हे द्वेष पसरवणारे ग्रंथ आहेत.

ते पुढे म्हणाले की, एका युगामध्ये मनुस्मृती, दुसऱ्या युगामध्ये रामचरितमानस आणि तिसऱ्या युगात गुरू गोळवलकर यांचं बंच ऑफ थॉट्स, हे सर्व देशात, समाजात द्वेष पसरवतात. द्वेष देशाला कधीही महान बनवणार नाही. देशाला महान केवळ प्रेमच बनवेल.

दरम्यान, या विधानावरून आता वादाला तोंड फुटले आहे. चंद्रशेखर यांनी दिलेल्या या विधानावरून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहजाद पुनावाला यांनी ट्विट केले आहे. बिहारचे शिक्षणमंत्री म्हणतात की, रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे. काही दिवसांपूर्वी जगदानंद सिंह यांनी रामजन्मभूमीला द्वेषाची भूमी म्हटलं होतं. हा केवळ योगायोग नाही तर हा व्होट बँकेचा उद्योग आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. 

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण