हरीबोल नगर येथे रामचरित मानस कथा
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
नाशिक : सिंहस्थ कुंभ पर्वणीनिमित्त चिंतामणी मंगल कार्यालयात सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमात आता रामचरीत मानस पारायणाची सुरुवा झाली आहे. रामचरित मानस कथेच्या यजमान अहमदाबादच्या सुलोचना बेन यंाच्याहस्ते महापूजा कथेच्या गायनास आरंभ झाला, १०८ ब्रााणांच्या साथीने नंदकिशोर शास्त्रीजी यांनी राम कथेचे गायन सुरु केले. यावेळी सर्व उपस्थितांना राम चरित मानसचे वितरण करण्यात आले.
हरीबोल नगर येथे रामचरित मानस कथा
नाशिक : सिंहस्थ कुंभ पर्वणीनिमित्त चिंतामणी मंगल कार्यालयात सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमात आता रामचरीत मानस पारायणाची सुरुवा झाली आहे. रामचरित मानस कथेच्या यजमान अहमदाबादच्या सुलोचना बेन यंाच्याहस्ते महापूजा कथेच्या गायनास आरंभ झाला, १०८ ब्रााणांच्या साथीने नंदकिशोर शास्त्रीजी यांनी राम कथेचे गायन सुरु केले. यावेळी सर्व उपस्थितांना राम चरित मानसचे वितरण करण्यात आले.दुपारी ३ वाजता ग्वालियरचे प्रवचनकार ब्राचारी विष्णू चैतन्य महाराजांनी राम कथेचा आरंभोत्सवा उपस्थित सर्व भाविकांना नृत्य करण्यास सांगुन केला आणि सर्वांनी भक्तिमय जल्लोषात राम नामाच्या तालावर ठेका धरला. याप्रसंगी स्वामी विद्यानंद सरस्वती, विजय वासन आणि हरीबोल कुंभ सेवा समितीचे सर्व सभासद उपस्थित होते. सोमवार (दि.७) पर्यंत चिंतामणी मंगल कार्यालयात दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत नंदकिशोर शास्त्री यांच्या स्वरात श्रीराम चरित मानस पारायण आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ यावेळात ब्राचारी विष्णू चैतन्य महाराजांच्या स्वरात श्रीराम कथा प्रवचन सुरु राहणार आहे. मंगलमय पारायणास व कथेच्या निरूपणास उपस्थित राहून प्रभु रामाच्या आशिर्वादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आचार्य महामंडलेश्वर स्वामी विद्यानंद सरस्वती महाराजांनी केले आहे. (वा.प्र.)फोटो : चिंतामणी मंगल कार्यालयात भक्तांना मार्गदर्शन करतांना स्वामी विद्यानंद सरस्वती महाराज, दुसर्या छायाचित्रात काम कथेचे निरुपण करतांना नंदकिशोर शास्त्री महाराज तर तिसर्या छायाचित्रात राम चरित मानस पारायण सांगतांना ब्राचारी विष्णू चैतन्य महाराज.