शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रमण सिंहांचे अधिकाऱ्यांना ‘टार्गेट’

By admin | Updated: May 24, 2016 01:00 IST

शासकीय योजना प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचत नाहीत, अशा अनेक तक्रारी येत असतात. योजनांच्या अंमलबजावणीचे काम अधिकाऱ्यांचे असते. जनतेपर्यंत योजना वेळेत पोहोचल्याच पाहिजे

- योगेश पांडे,  कवर्धा (छत्तीसगड)शासकीय योजना प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचत नाहीत, अशा अनेक तक्रारी येत असतात. योजनांच्या अंमलबजावणीचे काम अधिकाऱ्यांचे असते. जनतेपर्यंत योजना वेळेत पोहोचल्याच पाहिजे, यासाठी छत्तीसगड राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. ‘लोकमत’शी विशेष संवाद साधत असताना डॉ. रमण सिंह यांनी ही माहिती दिली.एरवी विविध राज्य शासनांमार्फत जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबविण्यात येतात. परंतु प्रत्यक्षात अनेकदा अधिकाऱ्यांकडून त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन लोकसुराज मोहिमेच्या माध्यमातून मी गावोगावी जाऊन स्वत: पाहणी करीत आहे. अनेकदा या भेटी आकस्मिक असतात. दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत असताना त्यांच्या समस्या मला प्रत्यक्ष जाणून घेता येत आहेत. राज्यातील विविध १६ योजनांची या माध्यमातून समीक्षा करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दोन वर्षांचे ‘टार्गेट’ दिले असून, दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.१०० टक्के गावांत वीज पोहोचविण्याचे आव्हानयेत्या अडीच वर्षांत १०० टक्के गावांत वीज पोहोचविण्याचे सर्वांत मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. याशिवाय पायाभूत सुविधा, रस्ते यांच्यावरदेखील भर देण्यात येत आहे. नक्षलप्रभावित भागांमध्ये यासाठी काही अडथळे निश्चित येत आहेत, असे त्यांनी सांगितले. करारांचे ‘ट्रॅकिंग’छत्तीसगडमध्ये ‘आयटी’ कंपन्या याव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आयटी, फूड प्रोसेसिंग, सौरऊर्जेसंदर्भात विविध सामंजस्य करार झाले आहेत. अनेकदा सामंजस्य करार होतात, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळे या करारांचे ‘एसआयपीबी’च्या (स्टेट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड) माध्यमातून नियमित ‘ट्रॅकिंग’ करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. सिंह यांनी दिली.