शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील राम मंदिर बाबराने नव्हे, तर औरंगजेबाने उद्धवस्त केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:24 IST

माजी आयपीएस अधिकाऱ्याचा दावा

अयोध्या : येथील राम मंदिर बाबराने नव्हे तर औरंगजेब बादशहाने उद््ध्वस्त केले, असा दावा किशोर कुणाल या माजी आयपीएस अधिकाºयाने लिहिलेल्या अयोध्या रिव्हिजिटेड या पुस्तकात करण्यात आला आहे.अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू आहे. या पुस्तकातील माहिती पुरावा म्हणून न्यायालयासमोर येणार का हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. किशोर कुणाल १९७२च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी होते.

बाबरी मशिदीच्या आधी त्या जागेवर राम मंदिर होते. याच जागी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता या आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ किशोर कुणाल यांनी या पुस्तकात अनेक पुरावे दिले आहेत. त्यामध्ये प्राचीन संस्कृत ग्रंथांमधील उतारे, पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननांचे अहवाल यांचा समावेश आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत माजी सरन्यायाधीश जी. बी. पटनायक यांनी म्हटले आहे की, अयोध्या वादासंदर्भात या पुस्तकामुळे नवे पैलू उजेडात आले असून, त्यांच्या समर्थनार्थ अनेक सबळ पुरावेही दिलेले आहेत. या पुस्तकात किशोर कुणाल यांनी म्हटले आहे की, राम मंदिर बाबराच्या कारकिर्दीत इ. सन १५२८मध्ये नव्हे तर औरंगजेब सत्तेवर असताना इ. सन १६६०मध्ये उद््ध्वस्त करण्यात आले होते. त्यावेळी औरंगजेबचा सरदार फेदाई खान याच्या हातात अयोध्येची सारी सूत्रे होती. त्यामुळे राम मंदिर उद््ध्वस्त करण्याचे बाबराने आदेश दिले होते असे म्हणणे साफ चुक आहे. बाबराने अयोध्येला कधीही भेट दिली नव्हती. अवध प्रांताचा प्रमुख मीर बाकी याने इ. सन १५२८मध्ये मंदिर पाडून तिथे मशिद बांधली असा दावा अयोग्य आहे. नवाबांचा अयोध्येच्या बैराग्यांना आश्रयच्या पुस्तकात म्हटले आहे की, बाबरपासून शहाजहानपर्यंतचे मुघल बादशहा हे काही प्रमाणात उदारमतवादी होते. त्यांनी सर्वच धर्मांना आश्रय दिला होता. अवधच्या पहिल्या चार नवाबांनी अयोध्येच्या बैराग्यांनाही उदार आश्रय दिला होता याचे पुरावे उपलब्ध आहेत. मात्र औरंगजेबाच्या कारकीर्दीत अयोध्येतील राम मंदिर पाडले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या