शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राम रहीमच्या डे-यात स्फोटके आणि फटाक्यांची फॅक्टरी, डांबलेल्या ४८ जणांची झाली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:53 IST

बलात्कारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहीमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सुरू असलेल्या सर्च आॅपरेशनमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी आढळत असून, तेथे एक फटाक्यांचा अवैध

सिरसा : बलात्कारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहीमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सुरू असलेल्या सर्च आॅपरेशनमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी आढळत असून, तेथे एक फटाक्यांचा अवैध कारखाना होता, अनधिकृतपणे तेथे स्फोटकांचा साठा करून ठेवला होता आणि काही तरुण व अल्पवयीन मुला-मुलींना तेथे डांबून ठेवले होते, असे स्पष्ट झाले आहे.तेथून ३४ मुले व १४ मुलींची सुटका करण्यात आली आहे. फटाक्यांचा कारखाना सील करण्यात आला आहे. कारखान्याला कुलूप लावून ठेवले होते आणि लोहारांच्या मदतीने ते तोडण्यात आले. तसेच तेथे स्फोटकांचा अवैध साठाही सापडला, असे पोलिसांनी सांगितले. एका खोलीमध्ये काही शंकास्पद औषधे सापडली असून, ती नेमकी कशासाठी वापरली जात होती, याची तपासणी केली जात आहे. औषधांच्या बाटल्यांवर त्यांची नावेही नाहीत.राम रहीमने आपल्याला अटक झाल्यास दंगल व हिंसाचार घडवून आणा, असे काही समर्थकांना सांगितले होते. त्यासाठी पाच कोटी रुपयांची व्यवस्थाही करण्यात आली होती. पोलिसांनी त्यापैकी तीन अनुयायांना अटक केली आहे. त्यांच्यावर ५ कोटी रुपये खर्च करून हिंसा भडकवल्याचा आरोप आहे. चमकौर सिंह, कर्मजीत व दानसिंह अशी त्यांची नावे आहेत. चमकौर सिंह हा डेरा पंचकुला शाखेचा प्रमुख असून, तोच हिंसाचार घडवून आणण्यातील मुख्य आरोपी आहे.सिरसा डेरामध्ये वापरण्यासाठी प्लॅस्टिकचे चलन तयार करण्यात आले होते. लोकांकडून पैसे घेऊन त्यांना प्लॅस्टिकची नाणी दिली जात. हे प्लॅस्टिक चलन सर्व डेºयांमध्ये चालत असे. अशी अनेक नाणी तसेच मोठ्या प्रमाणात जुन्या व नव्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.राम रहीम जेथे ध्यानधारणेला बसायचा, त्या ठिकाणचे (गुहा) खोदकाम जेसीबी यंत्राद्वारे सुरू करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)डेºयातून १४ मृतदेह गेले मेडिकल कॉलेजलाराम रहीमच्या डेºयाकडून जानेवारी ते आॅगस्ट २०१७ पर्यंत १४ जणांचे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी दिले गेले. मात्र वैद्यकीय संस्थेला मृतदेह देताना डॉक्टर वा हॉस्पिटलचे मृत्यू प्रमाणपत्र आणि कुटुंबाचे संमतीपत्र आवश्यक असते.मृतदेह ताब्यात घेताना वैद्यकीय संस्थेला पोलिसांची संमती घ्यावी लागते. पण डेराकडून वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आलेल्या मृतदेहांच्या बाबतीत कोणतीच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती, अशीही माहिती समोर आली आहे.अनुयायी व्यावसायिकाची आत्महत्यासिरसा डेºयामध्ये ३ कोटी १0 लाख रुपये खर्च करून हॉटेल व रिसॉर्ट सुरू करणाºया बाबाच्या एका अनुयायाने आत्महत्या केली. त्याने डेरासाठी आपली १७ एकर जमीन दिली होती. बाबाच्या अटकेनंतर त्याचा धंदा पूर्णपणे बसला. आपले मोठे नुकसानच बाबामुळे झाले आहे, असे लक्षात आल्यामुळे सोमवीर याने आत्महत्या केली. तो चरखी दादरी या गावचा रहिवासी असून, तो बाबाचा अनुयायीही होता.

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीम