शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

बलात्कार, हत्येप्रकरणी जन्मठेप भोगत असलेला राम रहीम पॅरोलवर गुपचूप तुरुंगाबाहेर

By बाळकृष्ण परब | Updated: November 7, 2020 10:02 IST

Gurmeet Ram Rahim News : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेला राम रहिम बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यापासून रोहतकमधील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

ठळक मुद्देडेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा गुपचूप पॅरोलवर बाहेर आला होता मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील बीजेपी-जेजेपी सरकारने राम रहीमला २४ ऑक्टोबर रोजी एका दिवसाचा पॅरोल दिला होताराम रहीमला त्याच्या आजारी आईची भेट घेण्यासाठी एका दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता

चंदिगड - बलात्कार, हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा गुपचूप पॅरोलवर बाहेर आला होता, अशी माहिती समोर आली आहे. राम रहीम याला एका दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील बीजेपी-जेजेपी सरकारने राम रहीमला २४ ऑक्टोबर रोजी एका दिवसाचा पॅरोल दिला होता, असे उघड झाले आहे.डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेला राम रहिम बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यापासून रोहतकमधील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम रहीमला त्याच्या आजारी आईची भेट घेण्यासाठी एका दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता. राम रहीमची आई गुरुग्राममधील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. डेराप्रमुख राम रहिमला रोहतकमधील सुनारिया कारागृहातून गुरुग्राममधील रुग्णालयात चोख बंदोबस्तामध्ये नेण्यात आले होते.राम रहीम हा २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळपर्यंत आपली आईसोबत थांबला होता. सूत्रांनी सांगितले की, हरयाणा पोलिसांच्या तीन तुकडा त्याच्या सुरक्षेसाठी तैनात होत्या. एका तुकडीमध्ये ८० ते १०० जवान होते. डेराप्रमुख राम रहीमला पोलिसांच्या वाहनातून गुरुग्राममधील रुग्णालयात नेण्यात आले होते. तसेच भेटीच्या वेळी राम रहीमची आई उपचार घेत असलेला फ्लोअर पूर्णपणे रिकामी ठेवण्यात आला होता.

याबाबत रोहतकचे एसपी राहुल शर्मा यांनी सांगितले की, आम्हाला जेल सुपरिंटेंडेंटकडून राम रहीम यांच्या गुरुग्राम दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यासाठी निवेदन मिळाले होते. आम्ही २४ऑक्टोबर रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली.दरम्यान, गुरमीत राम रहीमला पॅरोल देण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. राम रहीमला देण्यात आलेल्या पॅरोलची माहिती मुख्यमंत्री आणि हरयाणामधील काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाच याची माहिती होती. इतकेच नाहीतर आपण कुणाला एस्कॉर्ट करत आहोत याची माहिती जवानांनाही नव्हती. मात्र राम रहीमला अशा प्रकारे जामीन देऊन हरयाणामधील अधिकाऱ्यांनी भविष्यात त्याला पॅरोल देण्याचा मार्ग मोकळा करून ठेवला आहे.

टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीमDera Saccha Saudaडेरा सच्चा सौदाHaryanaहरयाणा