शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

राम रहीमवरील दोन हत्येच्या आरोपांची सुनावणी सुरू, व्हिडीओ कॉन्फरन्सने साक्ष, पंचकुलामध्ये प्रचंड बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:50 IST

आपल्या आश्रमातील साध्वींवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमवर दोन हत्या केल्याचा आरोप असून, त्याची सुनावणी शनिवारी न्यायालयात सुरू झाली.

चंदिगड : आपल्या आश्रमातील साध्वींवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमवर दोन हत्या केल्याचा आरोप असून, त्याची सुनावणी शनिवारी न्यायालयात सुरू झाली. राम रहीम तुरुंगात असून, सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. राम रहीमचा एके काळचा ड्रायव्हर याने आता या दोन्ही प्रकरणांत राम रहीमचा हात होता, असे म्हटले आहे.या खटल्याच्या निमित्ताने पंचकुलामध्ये निमलष्करी सैनिकांच्या तुकड्या व हरयाणा पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सीबीआय न्यायालयात आता पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेराचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंहयांच्या हत्येविरोधात सुनावणी सुरू झाली असून, ते सिद्ध झाल्यास जन्मठेप वा फाशीची शिक्षा होऊ शकते.सिरसातील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी ‘पुरा सच’ या सायंदैनिकात डेरा सच्चा सौदाधील अन्याय व अत्याचाराची अनेक प्रकरणे प्रसिद्ध केली होती. डेरामध्ये सुरू असलेल्या लैंगिक शोषणाचा गौप्यस्फोटही त्यांच्याच वृत्तापत्राद्वारे करण्यात आला होता. त्यानंतर आॅक्टोबर २00२ मध्ये रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात ते मरण पावले. तेव्हापासून त्यांचा मुलगा ही कायदेशील लढाई लढत आहे.हत्येचे दुसरे प्रकरणडेरा सच्चाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजीत सिंह यांची हत्या १0 जुलै २00३ रोजी झाली. राम रहीमने एका साध्वीवर केलेला बलात्कार तसेच एकूणच सारी काळी कृत्ये रणजीत सिंह यांना माहीत होती. त्यामुळे राम रहीमने त्यांचीही हत्या घडवून आणली, असा आरोप आहे. रणजीत सिंह यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेऊ न राम रहीमला शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २00३ मध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने २00७ साली रोजी आरोपपत्र दाखल केले.

 

टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीम