शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशावरुन राम जेठमलानींचा मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार

By admin | Updated: April 28, 2015 15:43 IST

विदेशातील बँकांमध्ये दडलेला काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन देत सत्तेवर विराजमान झालेल्या मोदी सरकारला पूर्वाश्रमीचे भाजपा नेते व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी चांगलेच धारेवर धरले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ - विदेशातील बँकांमध्ये दडलेला काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन देत सत्तेवर विराजमान झालेल्या मोदी सरकारला पूर्वाश्रमीचे भाजपा नेते व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी चांगलेच धारेवर धरले. युपीए सरकार असो किंवा मोदी सरकार काळ्या पैशाबाबत अद्याप ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही अशा शब्दात राम जेठमलांनीनी नाराजी व्यक्त केली आहे. 

काळा पैसा परत आणून त्याचा वापर देशाच्या विकासासाठी करु अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात दिली. १०० दिवसांत हा पैसा परत आणू असेही त्यांनी सांगितले होते. मात्र सत्तेवर येऊन ११ महिन्यांचा कालावधी होऊनही अद्याप काळा पैसा परत येऊ शकलेला नाही. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीदेखील हा निवडणुकीतील 'जुमला' होता असे सांगितले होते. याच मुद्द्यावरुन भाजपातून हकालपट्टी झालेले राम जेठमलानी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विदेशातील बँकांमध्ये भारतातील सुमारे ९० लाख कोटी रुपयांचा काळा दडला आहे असा दावा करत जेठमलानी म्हणतात, मोदी सरकार सत्तेवर येण्यासाठी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन हे एक प्रमुख कारण होते. युपीए सरकार या मुद्द्यावर गप्प होते. पण आता  मोदी सरकारही यावर गप्प आहे हे बघू दुःख होते असे जेठमलांनीनी म्हटले आहे. 

जेठमलांनीनी मोदी सरकारला १३ प्रश्नही विचारले आहेत. दुहेरी कर आकारणीला आळा घालणारा कराराचा तुम्ही सखोल अभ्यास केला आहे का, भाजपाच्याच एका समितीने काळा पैशा संदर्भात २०११ मध्ये तयार केलेला अहवाल तुम्ही वाचला आहे का, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या 'जुमला' विधानावर तुमची भूमिका काय असे असंख्य सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारले आहेत.