शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

रामजन्मभूमी आंदोलन; आमचा विश्वास योग्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 03:00 IST

लालकृष्ण अडवाणी; हा आनंदाचा क्षण

नवी दिल्ली : रामजन्मभूमी आंदोलनावर भाजप व माझा असलेला विश्वास व सहभाग योग्यच होता, हे बाबरी मशीद पाडल्याच्या खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालातून दिसून आले, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. अडवाणी यांनी ‘जय श्रीराम’ अशी घोषणाही दिली.

अडवाणी म्हणाले की, रामजन्मभूमीवर राममंदिर उभारावे या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर काही महिन्यांनी आम्हा सर्वांची निर्दोष मुक्तता केली. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळे सत्य उजेडात आले असल्याने आता या सर्व प्रकरणावर पडदा पडला पाहिजे, असे माजी केंद्रीयमंत्री मुरली मनोहर जोशी यांनी म्हटले आहे. या निकालाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, विश्व हिंदू परिषद, भाजप यांनीही स्वागत केले आहे. निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले आहे. इतर अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी समाजात सलोखा असणे आवश्यक आहे, असेही संघाने म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधातील निकाल : काँग्रेससर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल व राज्यघटनेतील मूल्ये यांच्या विरोधात जाणारा विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाच्या निकालाविरोधात केंद्र व राज्य सरकारांनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागावी, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.कोणत्या जादूने मशीद पाडली? -ओवेसीबाबरी मशीद पाडणे हा पूर्वनियोजित कट नव्हता, तर मग अशी कोणती जादू झाली होती की, ६ डिसेंबर १९९२ रोजी प्रचंड संख्येने लोक बाबरी मशिदीजवळ जमले व त्यांनी ती वास्तू पाडली, असा सवाल एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.आव्हान देणार : निकालाला उच्च न्यायालयात आव्हानदेण्यात येईल, असे आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य झफरयाब जिलानी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयRam Mandirराम मंदिर