शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत रामभक्तांची रीघ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली अभिषेक पूजा; ५६ पदार्थांचा नैवेद्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 07:13 IST

गेल्यावर्षी दि. २२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता.

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राममंदिरातील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले असून, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सामील झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामलल्लाला अभिषेक केला. 

२२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. परंतु, हिंदू पंचांगातील ‘तिथी’नुसार यंदाचा वर्धापन सोहळा ११ ते १३ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे,  अशी माहिती मिश्रा यांनी दिली. राममंदिराच्या प्रांगणात शनिवारी यजुर्वेद पठणाने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. या मंदिराला फुलांची आरास करण्यात आली आहे. गेल्यावर्षी दि. २२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता.

देशभरातील ११० मान्यवरांना निमंत्रणत्याला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजिलेल्या सोहळ्यात सहभागी झालेले अनुप मिश्रा यांनी सांगितले की, जानेवारी २०२४मध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी रामजन्मभूमीत येणे मला शक्य झाले नव्हते. पण त्या सोहळ्याच्या प्रथम वर्धापनदिनी येण्याचे भाग्य आम्हाला लाभले. सोहळ्याच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शनिवारपासून विशेष सोहळा सुरू झाला असून, तो दि. १३ जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यासाठी ११० मान्यवरांसह अनेक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येतील अंगद टिला परिसरात पाच हजार लोकांच्या वास्तव्यासाठी तंबू उभारण्यात आले आहेत. दररोज पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक विधी, ‘रामकथा’ प्रवचन होणार आहे. दि. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्लाच्या नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. 

आध्यात्मिकतेचे महान प्रतीक : पंतप्रधान पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, राममंदिरात विराजमान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. अनेक शतकांच्या त्याग, तपस्या, संघर्षानंतर बांधलेले मंदिर संस्कृती व आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. हे भव्य राममंदिर विकसित भारत या संकल्पाच्या पूर्ततेसाठी प्रेरणास्रोत ठरेल. 

तीन कोटींहून अधिक भक्तांनी घेतले दर्शनश्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिराच्या उभारणीनंतर मागील वर्षभराच्या कालखंडात देश-विदेशातील ३ कोटींहून अधिक भक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. या मंदिराचे तीन मजले पूर्ण झाले आहेत. सध्या मंदिराच्या शिखराचे काम सुरू असून, ते दोन महिन्यांत पूर्ण होईल. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर