शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये उद्या 'चक्का जाम' होणार नाही, राकेश टिकैत यांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 18:28 IST

Rakesh Tikait, Bharatiya Kisan Union : संयुक्त किसान मोर्चाकडून ६ फेब्रुवारीला म्हणजेच उद्या देशभर चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने आता शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाकडून ६ फेब्रुवारीला म्हणजेच उद्या देशभर चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मात्र, उत्तर प्रदेश व उत्तराखंड येथे उद्या चक्का जाम होणार नसल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी सांगितले.

जे लोक याठिकाणी (शेतकरी आंदोलनात) येऊ शकले नाहीत, ते आपआपल्या ठिकाणी शांततेत चक्का जाम करतील, हा चक्का जाम दिल्लीत होणार नाही, असे राकेश टिकैत यांनी सांगितले. याचबरोबर, उद्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील चक्का जाम आंदोलन केले जाणार नाही. दिल्ली सोडून देशाच्या अन्य भागातील रस्ते बंद केले जातील. कारण, कधीही दिल्लीला बोलाविले जाऊ शकते, त्यामुळे त्यांना स्टॅण्डबाय ठेवले आहे, असे राकेश टिकैत म्हणाले.

दरम्यान, राकेश टिकैत यांच्या म्हणण्यानुसार, चक्का जाम केवळ तीन तास (दुपारी १२ ते ३ ) या वेळेत होईल. या काळात शेतकरी आपआपल्या भागांमधील रस्ते जाम करतील आणि रस्त्यांवर बसून कृषी कायद्यांना विरोध दर्शवतील. तीन तासानंतर आंदोलकांकडून गाव, ब्लॉक, जिल्हास्तरावर स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल.

याचबरोबर, शेतकरी नेत्यांच्या म्हणण्यानुसार, चक्का जाम दरम्यान शेतकरी संघटना सर्वसामान्य लोकांना शेंगदाणे, हरभरा, पाणी, फळे  व इतर वस्तू खाण्यासाठी देतील. प्रत्येक गावातून दोन ट्रॅक्टर दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी येतील. ते आंदोलनाच्या ठिकाणी काही दिवस थांबतील आणि नंतर गावात परततील.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैत