शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

RajyaSabha: पीटी उषा आणि इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेवर जाणार, PM नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 20:56 IST

देशातील महान धावपटू पीटी उषा आणि महान संगीतकार इलैयाराजा यांच्यासह वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद राज्यसभेवर जाणार आहेत.

नवी दिल्ली: भारताची महान धावपटू पीटी उषा आणि महान संगीतकार इलैयाराजा यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनाही राज्यसभेवर पाठवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

पीटी उषांबद्दल माहिती देताना पीएम मोदी म्हणाले की, पीटी उषा क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वत्र ओळखल्या जातात. यासोबतच नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कामही तितकेच कौतुकास्पद आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. इलैयाराजा यांचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, इलैयाराजा यांनी पिढ्यानपिढ्या लोकांना आपल्या संगीताने मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या रचना अनेक भावनांचे सुंदर चित्रण करतात. ते अतिशय नम्र असून, त्यांनी बऱ्याच गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे. वीरेंद्र हेगडे यांनाही राज्यसभेवर पाठवले जात आहे. त्यांच्याबद्दल माहिती देताना पीएम मोदी म्हणाले की, ते समाजसेवेत आघाडीवर आहेत. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची आणि आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेले महान कार्य पाहण्याची संधी मिळाली. ते संसदीय कामकाज नक्कीच समृद्ध करेल.  या तीन लोकांशिवाय व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनाही राज्यसभेवर पाठवले जात आहे. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्याबद्दल पंतप्रधान म्हणाले की, ते अनेक दशकांपासून सर्जनशील जगाशी जोडलेले आहेत. त्यांच्या कलाकृतींतून भारताच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडते आणि जागतिक स्तरावर त्यांचा ठसा उमटला आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल अभिनंदन.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदी