शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राज्यसभेसाठी ‘आप’मध्ये मैं.. मैं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 04:16 IST

नवी दिल्ली : राज्यसभेत नामवंतांना संधी देण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रयत्न फसत असल्याचे चित्र आहे. तीन जागांसाठीच अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेत नामवंतांना संधी देण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रयत्न फसत असल्याचे चित्र आहे. तीन जागांसाठीच अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. सेवानिवृत्त सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती, नोबेल पुरस्काराने सन्मानित कैलाश सत्यार्थी यांना ‘आप’च्या वतीने राज्यसभेत पाठवायची केजरीवाल यांची खूप इच्छा होती, असे समजते.राज्यसभेच्या येत्या १६ जानेवारी रोजी होणाºया द्वैवार्षिक निवडणुकांत ‘आप’ला तिन्ही जागा जिंकता येणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनाही केजरीवाल यांनी ही संधी देऊ केली होती, परंतु राजन यांनी शिकागो विद्यापीठातील शिकवण्याचे पूर्णवेळचे काम सोडण्याचा विचार नसल्याचे सांगून नकार दिला होता.‘आप’च्या विधि शाखेचे प्रमुख गोपाल सुब्रमणियम आणि यशवंत सिन्हा व अरुण शौरी हे माजी केंद्रीय मंत्री यांच्याही नावांचा उल्लेख झाला आहे. सिन्हा हे नुकतेच एका कार्यक्रमात केजरीवाल यांच्यासोबत व्यासपीठावर होते व त्यांनी केजरीवालांचे भरपूर कौतुकही केले होते. आपच्या सुरुवातीच्या वर्षांतील सहानुभूतीदार उद्योगपती राजीव बजाज आणि सुनील मुंजाळ यांच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे, असे कळते. परंतु त्यांनी आम्हाला राजकीय भूमिकेत शिरायचे नाही, असे स्पष्ट केले.राज्यसभेत संधी मिळण्यासाठी पक्षातील बंडाला केजरीवाल तोंड देत आहेत. ‘आप’चे संस्थापक कुमार विश्वास यांच्या पाठिराख्यांनी पक्षाच्या कार्यालयापाशी चार तास धरणे धरले.आशुतोष, संजय सिंह आणि आशिष खेतान आदी वरिष्ठ नेत्यांचेही प्रयत्न आहेत. ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी केजरीवाल पक्षाचा पाया व्यापक करण्याच्या प्रयत्नांत आहेत.राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी ‘आप’ला चार राज्यांत सहाटक्के मते मिळवावी लागतीलकिंवा तीन राज्यांत लोकसभेच्या ११ जागा जिंकाव्या लागतील. चार राज्यांत सहा टक्के मते मिळवण्यासाठी ‘आप’ राज्याराज्यांत निवडणूक लढवत आहे.>पुढील आठवड्यात होणार नावे निश्चितराज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज ३० डिसेंबरपासून भरता येतील व पाच जानेवारी हा त्याचा शेवटचा दिवस आहे. ‘आप’ची राजकीय व्यवहार समिती पुढील आठवड्यात पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित करील. चर्चा अशीहीआहे की केजरीवाल हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्यासाठी स्वत:च राज्यसभेत जातील व दिल्लीची सूत्रे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याकडे देतील. काँग्रेसचे तीन खासदार जनार्दन द्विवेदी, परवेझ हाशमी आणि डॉ. करण सिंह यांचा कार्यकाळ २७ जानेवारी रोजी संपत आहे आणि ‘आप’कडे दिल्ली विधानसभेत ६६ आमदार असल्यामुळे त्याला तीन जागा जिंकता येणार आहेत.