शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Rajya Sabha Elections: गाण्याच्या भेंड्या, वेब सीरिज अन् मॅजिक शो... रिसॉर्टमध्ये आमदारांचा राजेशाही थाट, सारंकाही 'खुर्ची'साठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:15 IST

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीसाठी १० जून रोजी होणाऱ्या मतदानाआधी आता 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'ची खूप चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणामध्ये एकेक जागेसाठी 'कांटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे.

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीसाठी १० जून रोजी होणाऱ्या मतदानाआधी आता 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'ची खूप चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणामध्ये एकेक जागेसाठी 'कांटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांच्या मतालाही चांगला भाव आला आहे. यातच प्रत्येक पक्ष आपले आमदार राखण्यासाठी त्यांना पंचतारांकित हॉटेल आणि रिसॉर्टवर ठेवण्याची लगबग करत आहे. 

पंचतारांकित हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलेल्या आमदारांना अगदी राजेशाही सुविधा दिल्या जात आहेत. आमदारांच्या विरंगुळ्यासाठी पूल स्प्लॅश, महागडे गेम्स, मॅजिक शो अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आमदारांकडून कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. राजस्थान काँग्रेसचे आमदार २ जूनपासून उदयपूरच्या ताज अरावली रिसॉर्ट आणि स्पामध्ये वास्तव्याला आहेत. 

अबब! राज्यसभेची १ जागा अन् कोट्यवधी पणाला; पंचतारांकित हॉटेलचा खर्च तरी पाहा

पक्षाचे आमदार हॉटेलमध्येच वाढदिवस साजरा करत आहेत. सिनेमे पाहात आहेत. तर विरंगुळ्यासाठी अगदी गाण्याच्या भेंड्याही खेळत आहेत. रिसॉर्टमधील काही फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. यात काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह यांच्यासोबत मॅजिक शोचा आनंद घेत असल्याचं दिसून आलं आहे. काही आमदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत असल्याचेही काही व्हिडिओ समोर आले आहेत. काही आमदार आपली गाण्याची आवड पूर्ण करताना दिसले तर काही पूलमध्ये पहुडताना दिसले. 

भाजपा आमदारांबाबत बोलायचं झालं तर त्यांना उदयपूरच्या देवी रत्न हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ६ ते ९ जूनमध्ये आमदारांना पक्षाची विचारधारा, मिशन २०२३ आणि मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित १२ सेशनला हजेरी लावण्यास सांगण्यात आलं आहे. दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत आमदारांना राज्यसभेत मदतान करण्यासाठीचं ट्रेनिंग देखील दिलं जात आहे. 

महाराष्ट्रात आमदारांना 'पंचतारांकित' सेवाराज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. यात शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तर भाजपा आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसनंही आपल्या आमदारांसाठी पंचतारांकित हॉटेल बुक केलं आहे. आमदारांच्या सुविधेसाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. 

छत्तीसगडमध्येही आमदारांचा 'रॉयल' कारभारछत्तीसगडची राजधानी रायपूरच्या मेफेयर लेक रिसॉर्टमध्येही तिच परिस्थिती आहे. या हॉटेलमध्ये काँग्रेसनं हरियाणातील आमदारांना ठेवलं आहे. काँग्रेसचे आमदार २ जून रोजी चार्टर्ड फ्लाइटनं दिल्लीहून रायपूरला या रिसॉर्टवर पोहोचले. १० जून रोजी हेच आमदार चंडीगडसाठी रवाना होतील.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक