शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

Rajya Sabha Election: मोठी बातमी! शिवसेनेला झटका; आमदार सुहास कांदेंचे मत बाद, मतमोजणीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 01:02 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद करून मतमोजणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली - राज्यसभेच्या निवडणुकीला शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. या निवडणुकीत मविआच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. त्यावर दीड तास केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद करून मतमोजणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील तासाभरात राज्यसभेच्या मतदानाचा निकाल लागू शकतो. इतर ४ मतांसह मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सुहास कांदे यांचे मत बाद झाल्याने शिवसेनेला झटका बसला आहे. सुहास कांदे यांनी मतपत्रिका निवडणूक प्रतिनिधींसह दुसऱ्या व्यक्तीलाही दाखवल्याचा आरोप होता. त्याबाबत व्हिडीओ फुटेज पाहून केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. 

 

 ...तर माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकतेयाबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मत दिल्यानंतर ते पक्षाच्या एजंटला दाखवणे आवश्यक असते, तसे केले नाही तर पक्षाचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, पक्ष कारवाई करू शकतो. दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्रला वेठीस धरून, मोठा संभ्रम निर्माण करून, गैरसमज पसरत असतील तर, त्याचा स्पष्ट खुलासा करण्यासाठी मी येथे आलो आहे. "मी साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमारास विधानसभेत पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तेथून मला जे सांगण्यात आले. ते ऐकूण मी मतदानासाठी गेलो. मतदान केल्यानंतर मी ते माझ्या पक्षांच्या एजंटना दाखवले. तेव्हा कागद माझ्या छातीवर होता, कॅमेरा माझ्या मागे होता. त्यावेळी मी थोडा हसलो. त्याला वेगळे कारण होते. यानंतर मतपत्रिका बंद करून मी बाहेर आलो, मतदान पेटीकडे गोलो, मतदान टाकले आणि बाहेर निघून गेलो असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.  

तर महाराष्ट्राला वेठीस धरण्याची एकही संधी दिल्ली सोडत नाही. महाराष्ट्राच्या शत्रूंना कोपरापासून नमस्कार! आज नमस्कार. उद्या हात सोडावा लागेल हे लक्षात ठेवा! भारतीय जनता पक्षाने देशातील  लोकशाही, न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा, आणि निवडणुक आयोगास देखील पकडीत घेतले आहे. महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 तास लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? जिंकणार तर महाविकास आघाडीच असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाShiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग