शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत प्रचंड गदारोळ; महिला खासदारांसोबत झाले गैरवर्तन, शरद पवारांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 00:03 IST

Monsoon Session Of Parliament: साधारण विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवायचे, अशी मागणी करत गोंधळ घातला.

नवी दिल्ली : राज्यसभेत पेगासस हेरगिरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचे अधिकार देणारे राज्यसभेतील एक महत्त्वाचे विधेयक जवळपास सहा तास चर्चा करून मंजूर करण्यात आले.

संविधान (१२७ वी दुरुस्ती) विधेयक, २०२१ सभागृहात मंजूर झाल्यावर साधारण विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयकावर आसनाच्या परवानगीने चर्चा सुरू झाली. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. साधारण विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवायचे, अशी मागणी करत गोंधळ घातला. परंतु गोंधळात सरकारने हे विधेयक मंजूर केले. 

सरकारच्यावतीने दावा करण्यात आला की, विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातील मार्शल आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, तर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारवर विरोधी खासदारांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्या १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. नंतर विमा संबंधी विधेयक मंजूर झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज संध्याकाळी ७.०४ पर्यंत अर्धा तास तहकूब करण्यात आले. गोंधळ घालणारे खासदार सभापतींच्या आसनाच्या अगदी जवळ आले आणि त्यांनी कागदपत्रे फाडली आणि हवेत आसनाकडे फेकून दिली.

मल्लिकार्जुन खर्गेंचा आरोपविरोध प्रदर्शनादरम्यान उपस्थित असलेल्या काही महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या महिला खासदारांसोबत धक्काबुकी केली आणि त्यांचा अपमान केला. विरोधी पक्षांचे खासदार निषेधासाठी आसानाकडे जातात तेव्हा पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वेढा तयार केला जातो, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.  ते म्हणाले, "आमच्या महिला खासदार येत आहेत... वेढा बांधला जात आहे... धक्काबुक्की केली जात आहे... महिला खासदारांचा अपमान केला जात आहे... महिला खासदार सुरक्षित नाहीत... हा संसद आणि लोकशाहीचा अपमान आहे.''

हा लोकशाहीवर हल्ला - शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "आपल्या ५५ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत आज (राज्यसभेत) महिला खासदारांवर ज्या प्रकारे हल्ला झाला आहे, ते  कधीही पाहिले नाही. ४० हून अधिक महिला आणि पुरुषांना बाहेरून सभागृहात आणण्यात आले. हे वेदनादायक आहे. हा लोकशाहीवर हल्ला आहे."

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा