शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा १0 वेळा तहकूब, भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयक झालेच नाही मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:39 IST

आक्रमक विरोधकांमुळे राज्यसभेचे कामकाज बुधवारी तब्बल १0 वेळा तहकूब झाले. मोदी सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयकावर अखेरपर्यंत चर्चा होऊ शकली नाही. चर्चेविनाच विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्नही फसला.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली - आक्रमक विरोधकांमुळे राज्यसभेचे कामकाज बुधवारी तब्बल १0 वेळा तहकूब झाले. मोदी सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयकावर अखेरपर्यंत चर्चा होऊ शकली नाही. चर्चेविनाच विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्नही फसला. अखेर सायंकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी उपसभापती पी.जे. कुरियन यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजता सुरू होताच केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यांना भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयक मांडण्यास सभापतींनी अनुमती दिली. हे विधेयक सादर करताच, सभागृहात गोंधळ सुरू झाला. बहुतांश विरोधक घोषणा देत सभापतींसमोरील आसनासमोर उतरले. त्यामुळे आधी ३0 मिनिटांसाठी तर नंतर दुपारी २.४३ वाजता तसेच ३.१३, ३.३९, ३.५४,४.१0,४.३0, ४.४५, व ४.५५ वाजता गदारोळामुळे कामकाज तहकूब होत गेले.उपसभापतींनी गोंधळ करणाऱ्यांना जाण्याचे आदेश देताना हे विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या सुखेन्दु शेखर यांनी मतविभाजनाची मागणी केली. काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले की, राज्यसभेत अनेक नवे सदस्य आले आहेत. त्यांची नावे इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर नसल्याने मतदानात त्यांना तांत्रिक अडचणी आहेत. त्यापेक्षा कामकाज तहकूब करणे उचित ठरेल.त्यावर संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार म्हणाले की, शर्मा सभागृहाची दिशाभूल करीत आहेत, विधेयक मंजूर करता येऊ शकते. राज्यमंत्री विजय गोयल म्हणाले की, भ्रष्टाचाराविरोधात कठोर तरतुदींचे हे विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे. गेले १९ दिवस सभागृहात कामकाज झालेले नाही. अशा प्रकारे सभागृहाला वेठीला धरणे सर्वथा अनुचित आहे. विरोधी सदस्यांनी विधेयक मंजुरीला सहकार्य करावे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनीही नवे सदस्य जरूर मतदान करू शकतात, जुन्या सदस्यांप्रमाणे त्यांनाही मतदानाचा अधिकार आहेच असा दावा केला. उपसभापती कुरियन म्हणाले, तांत्रिक अडचण असल्यास नव्या सदस्यांचे कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान घेता येईल. मात्र विरोधक ऐकायला तयार नसल्याने आणखी तीनदा कामकाज तहकूब झाले.सायंकाळी ५.११ वाजता उपसभापती कुरियन यांनी अत्यंत विनवणीच्या स्वरात सदस्यांना विधेयकाच्या मंजुरीबाबत मत विचारले. निवडून आलेल्या सरकारला संसदेत विधेयक मंजूर करण्याचा अधिकार नाही काय? असा प्रश्नही त्यांनी केला. तृणमूलचे सुखेन्दु शेखर म्हणाले की मतविभाजन शक्य नसेल तर कामकाज तहकूब करण्याशिवाय पर्यायच नाही. या सर्व काळात उपसभापतींच्या आसनासमोर विरोधी सदस्यांची घोषणाबाजी व गोंधळ चालूच होता. अखेर सायंकाळी ५.१४ वाजता राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.उपसभापतीपदाची आॅफर नाही : राऊ तशिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी राज्यसभेचे उपसभापतीपद देण्यास भाजपा नेते तयार आहेत, या वृत्ताचा संजय राऊ त यांनी ठामपणे इन्कार केला आहे. अशी कोणतीही आॅफर भाजपाकडून आलेली नाही, आली तरी शिवसेना ती स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत शिवसेनेचे संजय राऊ त, राजकुमार धूत व अनिल देसाई हे तीन सदस्य आहेत. तिघांमधे संजयराऊ त सर्वात अनुभवी आहेत. हा प्रस्ताव स्वीकारल्यास या मानाच्या पदावर त्यांची अथवा अनिल देसार्इंची वर्णी लागू शकते.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदIndiaभारतPoliticsराजकारण