शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राजपूत करणी सेनेचा पद्मावतला विरोधच, भारत बंदची घोषणा; प्रसुन जोशी, हरिश साळवे यांना धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:45 IST

'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी राजपूत करणी सेना व काही भाजपाशासित राज्ये प्रयत्न करीत असून, राजस्थान सरकारने चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर २५ जानेवारी रोजी भारत बंद करण्याची घोषणा राजपूत करणी सेनेने केली आहे. त्याच दिवशी हा चित्रपट देशभरात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

नवी दिल्ली : 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी राजपूत करणी सेना व काही भाजपाशासित राज्ये प्रयत्न करीत असून, राजस्थान सरकारने चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर २५ जानेवारी रोजी भारत बंद करण्याची घोषणा राजपूत करणी सेनेने केली आहे. त्याच दिवशी हा चित्रपट देशभरात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.करणी सेनेने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसुन जोशी यांना जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये येऊ देणार नाही आणि भन्साळी यांच्या एकाही चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थानात होऊ देणार नाही, अशी धमकीच दिली आहे. पद्मावतच्या प्रदर्शनास परवानगी देणाºयांना व समर्थन करणाºयांना आम्ही जयपूरमध्ये प्रवेश करू देणारनाही, असे करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह म्हणाले.पद्मावतच्या निर्मात्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांनाही करणी सेनेच्या नावाने धमकी आली आहे. एका अज्ञात इसमाने त्यांच्या कार्यालयात फोन करून, पद्मावतच्या बाजूने बोलू नका, अशी धमकी दिली असून, त्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. मेवाडच्या राजघराण्यातील महाराज महेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पत्र लिहून, चित्रपटाचे इतिहासाचे विकृत चित्रण केले आहे. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात यावी आणि राज्यात हिंसाचार टाळावा, अशी विनंती केली आहे.दरम्यान पद्मावतसाठी अभिनेता अक्षयकुमार याने आपल्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे, असे सांगण्यात येते. (वृत्तसंस्था)बंदीसाठी प्रयत्न सुरूचराजस्थान, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्याची इच्छा आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून, ते चित्रपटावर बंदी घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे थिएटर मालकांनीच तो प्रदर्शित करू नये, असे प्रयत्न काही राज्य सरकारांतर्फे सुरू असल्याचे कळते. गुजरातमधील मल्टीप्लेक्स मालकांच्या संघटनेने आम्ही पद्मावत दाखवणार नाही, असे जाहीर केले आहे.भन्साळी यांचे निमंत्रण : करणी सेना सातत्याने धमक्या देत असली तरी संजय लीला भन्साळी यांनी संघटनेचे नेते लोकेंद्र सिंह कलवीयांना हा चित्रपट पाहण्यास येण्याचे निमंत्रण दिले आहे. कलवी यांनी ते मान्य केले आहे. पण संघटनेच्या इतर नेत्यांनाही बोलावण्यात यावे आणि चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सांगू, तसे करावे, असे कलवी यांनी भन्साळीयांना सांगितल्याचे कळते.

टॅग्स :Padmavatपद्मावत