ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २७ -सोमवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार शपथविधी सोहळ्यानंतर भारताचे १५ वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहे. गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र, रेल्वे अशी महत्वाची खाती भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आली आहेत. राजनाथ सिंह यांच्याकडे गृहखाते, अरूण जेटलींकडे अर्थ व संरक्षण खाते, सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय, सदानंद गौडांकडे रेल्वे मंत्रालय वेंकय्या नायडूंकडे नगर विकास, नितीन गडकरींकडे रस्ते वाहतूक व जहाज बांधणी खाते, मनेका गांधींकडे महिला व बालकल्याण मंत्री खाते सोपवण्यात आले आहे.
मंत्रीमंडळातील मंत्री व खाते :
कॅबिनेट मंत्री -
1)राजनाथसिंह - गृह
2) सुषमा स्वराज - परराष्ट्र मंत्रालय
3) अरुण जेटली - अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
4) वेंकय्या नायडू - संसदीय कामकाज, नगर विकास, गृह निर्माण
5)नितीन गडकरी - रस्ते वाहतूक व जहाजबांधणी
6) सदानंद गौडा - रेल्वे
7) उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
8) नजमा हेपतुल्ला - अल्पसंख्यांक
9) गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
10) रामविलास पासवान - अन्न, ग्राहक संरक्षण
11) कलराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
12)मनेका गांधी- महिला व बालकल्याण मंत्री
13) अनंतकुमार - रसायन आणि खत
14) रवी शंकर प्रसाद - कायदा व बालकल्याण
15) अशोक गजापती राजू पुसपती - नागरी उड्डाण मंत्री
16) अनंत गीते - अवजड उद्योग
17) हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
18)नरेंद्र सिंग तोमर - कामगार व रोजगार, स्टील मंत्रालय
19) जुएल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
20) राधा मोहन सिंह - कृषी
21) थावर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
22) स्मृती इराणी - मनुष्यबळ विकास
23) डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री
राज्यमंत्री -
1) जनरल व्ही. के. सिंह - परराष्ट्र राज्यमंत्री
2) इंद्रजीत राव सिंह - नियोजन व संरक्षण राज्यमंत्री
3) संतोषकुमार गंगवार - कापड ( स्वतंत्र प्रभार) संसदीय कामकाज, जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान राज्यमंत्री
4) श्रीपाद नाईक - सांस्कृतिक व पर्यटन ( स्वतंत्र प्रभार)
5) धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम व नॅचरल गॅस
6) सरबानंदा सोनोवाल - युवक कल्याण व क्रीडा
7) प्रकाश जावडेकर - माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
8) पीयुष गोयल - उर्जा राज्य मंत्री
9) जितेंद्र सिंह - विज्ञान व तंत्रज्ञान
10) निर्मला सीतारामन - वाणिज्य व उद्योग मंत्री
11) जी. एम. सिद्धेश्वरा - नागरी उड्डयन राज्यमंत्री
12) मनोज सिन्हा - रेल्वे राज्यमंत्री
13) निहालचंद - रासायनिक व खते राज्यमंत्री
14) उपेंद्र खुशवाह - ग्रामीण विकास व पंचायत राज राज्यमंत्री
15) राधाकृष्ण पी. - अवजड उद्योग राज्यमंत्री
16) किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
17) कृष्णन पाल - दळणवळण राज्यमंत्री
18) डॉ. संजीव कुमार बलयान - कृषी राज्यमंत्री
19) मनसुखभाई वासवा - अदिवासी विकास राज्यमंत्री
20) रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण, अन्न राज्यमंत्री
21) विष्णुदेव साई - खाण, रोजगार व कामगार राज्यमंत्री
22) सुदर्शन भगत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री