शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गरज भासल्यास झुंडशाही रोखण्यासाठी कायदाही करणार- राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 06:25 IST

विरोधी पक्षांची लोकसभेत केंद्रावर टीका

नवी दिल्ली : झुंडशाहीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी गरज भासल्यास कायदा केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत केली. देशात झुंडशाहीचे प्रकार वाढत असल्याबद्दल सभागृहात विरोधी पक्षांनी जोरदार आवाज उठविला व कडक कारवाईची मागणी केली.राजनाथ सिंह यांनी सांगितले की, झुंडशाहीच्या घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून, आरोपींविरोधात अत्यंत कडक कडक कारवाई करण्यात येईल. अशा घटना घडत असल्याबद्दल काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डाव्या पक्षांनी लोकसभेत मोदी सरकारवर टीकेचा भडिमार केला. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांचे सदस्य शून्य प्रहरात लोकसभा अध्यक्षांसमोरील वेलमध्ये जमा झाले. या कृतीबद्दल नापसंती व्यक्त करुन मगच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काही विरोधी पक्ष सदस्यांना झुंडशाहीसंदर्भाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची परवानगी दिली.झुंडशाहीचे प्रकार रोखण्यासाठी उपोययोजना सुचविण्याकरिता दोन उच्चस्तरीय समित्या स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली होती. मारहाणीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी एक कायदा करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने हे पाऊल उचलले. त्यावेळी राजनाथ सिंह असेही म्हणाले होते की, जबर मारहाण व हिसांचाराची सर्वात मोठी घटना म्हणजे १९८४ साली घडलेली शीखविरोधी दंगल. या उद्गारांना काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला होता.लोकसभा नव्हे तर भाजपा हाऊस : खरगेराजस्थानमधील अल्वर जिल्ह्यातल्या लालावंडी गावामध्ये गायींची तस्करी केल्याच्या संशयावरुन अकबर खान या २८ वर्षीय युवकाला शनिवारी काही जणांनी जबर मारहाण केली. त्यात त्याचा बळी गेला.अशाच प्रकारच्या घटना सभागृहात चर्चेद्वारे उपस्थित करण्यास परवानगी मिळत नसल्याबद्दल तृणमूल काँग्रेस व काँग्रेसच्या सदस्यांनी शून्य प्रहर सुरु होताच नाराजी व्यक्त केली. ही लोकसभा नव्हे तर भाजपा हाऊस आहे असे उद्गारही काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी काढले. झुंडशाहीच्या प्रकारांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :LynchingलीचिंगRajnath Singhराजनाथ सिंहcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचार