नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय मंत्रिमडळात नंबर २ चे स्थान गृहमंत्री राजनाथसिंग यांनाच असल्याचे शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या एका अधिसूचनेवरून स्पष्ट झाले.मोदी अमेरिकेच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आवश्यक कामकाज पार पाडण्याबाबतच्या व्यवस्थेवर कॅबिनेट सचिवांनी जारी केलेल्या एका अधिसूचनेमुळे राजनाथसिंग यांचे हे स्थान पुढे आले आहे. ‘पंतप्रधानांनी निर्देश दिले आहेत की, २५ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर २०१४ या आपल्या विदेश दौऱ्याच्या काळात आपल्या अनुपस्थितीत आवश्यक कामकाज गृहमंत्री हाताळतील,’ असे कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी या अधिसूचनेत म्हटले आहे. मोदी ब्राझील दौऱ्यावर गेले होते त्यावेळीही अशीच व्यवस्था केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राजनाथसिंग हेच नंबर २ वर
By admin | Updated: September 27, 2014 06:52 IST