राजकुमार बडोले यांचा ऑफिसर्स फोरमतर्फे सत्कार
By admin | Updated: September 4, 2015 22:46 IST
फोटो आहे-
राजकुमार बडोले यांचा ऑफिसर्स फोरमतर्फे सत्कार
नाशिक : येथील सृजन या संस्थेतर्फे कुंभमेळा २०१५ विषयावर छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शिवाय यातील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन आणि कॉफी टेबल बुकही प्रसिद्ध करण्यात येणार असून, विजेत्यांना बक्षिसेही देण्यात येणार आहेत. व्यावसायिक छायाचित्रकार, हौशी छायाचित्रकार आणि मोबाइल फोटो अशा तीन गटांत ही स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेसाठी कुंभमेळा हा मुख्य विषय असला, तरी साधू-संत, आखाडे, गोदावरी मिरवणूक आणि भाविक-पर्यटक यांच्याही पलीकडे जाऊन कुंभमेळ्याचा सामाजिक आशय दर्शविणारी छायाचित्रेही अपेक्षित आहेत. त्यात आरोग्य, स्वच्छता, शिस्त, बंदोबस्त, व्यवसाय, आनंद-उत्साह तसेच प्रासंगिक बोलकी छायाचित्रे, भावभावना दर्शविणारी छायाचित्रेही असू शकतात.निवडक छायाचित्रांच्या कॉफी टेबल बुकचा वापर अभ्यासक्रमासाठी तसेच पुढील कुंभमेळ्यासाठी संदर्भ म्हणूनही व्हावा असा संस्थेचा उद्देश आहे. ही छायाचित्रे आगामी दोन पर्वण्या झाल्यानंतर २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत सृजनकडे प्रिंट स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी इमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.