शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रजनीकांत घेऊ शकतात मोदींची भेट! तामिळनाडूच्या राजकारणात रंगत

By admin | Updated: May 21, 2017 16:40 IST

राज्यव्यापी लोकप्रियता असलेल्या नेतृत्वाची तामिळनाडूमध्ये वानवा निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात

ऑनलाइन लोकमत 
चेन्नई, दि. 21 - तामिळनाडूच्या राजकारणात सध्या नव्या बदलाचे वारे वाहत आहेत. जयललितांचा आकस्मिक मृत्यू आणि एम. करुणांनिधींच्या वार्धक्यामुळे राज्यव्यापी लोकप्रियता असलेल्या नेतृत्वाची तामिळनाडूमध्ये वानवा निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यातच रजनीकांत यांनी स्वत: ही आपली पावले राजकारणाच्या दिशेने वळवण्याचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रजनीकांत हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची वदंता आहे. 
 
रजनीकांत यांच्या दक्षिणेतील कमालीच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचे भाकीत वारंवार वर्तवण्यात येत असते. दरम्यान, आज नवभारत टाइम्स या हिंदी संकेतस्थळाने मोदी आणि रजनीकांत यांच्या संभाव्य भेटीचे वृत्त दिले आहे. गेल्या आठवड्यात  चाहत्यांशी संवाद साधतांना रजनीकांत यांनी त्यांना मोठ्या लढ्यास तयार राहण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन  रजनी यांच्या राजकीयदृष्ट्या सक्रिय होण्याचे संकेत मानले जात आहे.  मी पक्का तामिळीच आहे. जर तामिळी लोकांनी स्वीकारले नाही तर मी थेट हिमालयात जाईन, असे रजनीकांत यांनी म्हटले होते. 
 
( रजनीकांत हा महामूर्ख आणि आडाणी: सुब्रमण्यम स्वामी )
 
दक्षिणेतील राजकारणात फिल्मी कलाकारांचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. तेथे अनेक कलाकारांनी सामान्य कलाकार ते अव्वल राजकारणी अशी झेप घेतली आहे. नुकत्याच दिवंगत झालेल्या माजी मुख्यमंत्री जयललिता आणि ज्येष्ठ नेते करुणानिधी यांनीही राजकारणात उतरण्यापूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावले होते.