चेन्नई - दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर सक्रिय राजकारणात उतरण्याची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी आज एक ट्विट करत ही घोषणा केली आहे. मी जानेवारीमध्ये नव्या पक्षाची स्थापना करणार असून, त्याची घोषणा ३१ डिसेंबर रोजी करण्यात येईल, असे रजनीकांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वारे जोरात वाहत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. रजनीकांत यांनीही सोमवारी आपल्या रजनी मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज दुपारी रजनीकांत यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची घोषणा करत पक्षाच्या घोषणेची तारीखही जाहीर केली आहे.
रजनीकांत सक्रिय राजकारणात, ३१ डिसेंबरला करणार पक्षाची घोषणा
By बाळकृष्ण परब | Updated: December 3, 2020 13:25 IST
Rajinikanth News : दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर सक्रिय राजकारणात उतरण्याची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.
रजनीकांत सक्रिय राजकारणात, ३१ डिसेंबरला करणार पक्षाची घोषणा
ठळक मुद्देरजनीकांत यांनी आज एक ट्विट करत राजकारणातील सक्रिय प्रवेशाची घोषणा केलीमी जानेवारीमध्ये नव्या पक्षाची स्थापना करणार असून, त्याची घोषणा ३१ डिसेंबर रोजी करण्यात येईलतामिळनाडूमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक होणार आहे