शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा 'ट्रेलर'! मुलीच्या परिक्षेसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; मुलीसह ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 16:52 IST

दुभाजक ओलांडून ट्रेलरची दोन वाहनांना धडक; भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

सिरोही: राजस्थानच्या सिरोहीजवळ राष्ट्रीय महामार्गावर नियंत्रण सुटलेल्या एका ट्रेलरनं दोन कारना धडक दिली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६२ वर एका ट्रेलरनं दुभाजक ओलांडला. त्यामुळे मोठा अपघात झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अपघातस्थळी पोहोचले. ट्रेलरचा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सिरोही येथील उथमण टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. पालीहून सिरोहीला जाणाऱ्या एका ट्रेलरवरचं नियंत्रण सुटलं. हा ट्रेलर दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला गेला. समोरून येणाऱ्या दोन कारना ट्रेलरची धडक बसली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला.

अपघातात मृत्यूमुखी पडलेलं कुटुंब त्यांच्या मुलीची परीक्षा असल्यानं पालीला जात होतं. त्याचवेळी ट्रेलरनं त्यांच्या कारला धडक दिली. कॉन्स्टेबल पदासाठी परीक्षा द्यायला जाणाऱ्या सुगना नावाच्या तरुणीचा मृतांमध्ये समावेश आहे. ४ महिन्यांची चिमुकलीदेखील अपघातात मृत पावली. अपघातानंतर ट्रेलर चालक फरार झाला.