राजस्थानमध्ये स्वाईन फ्ल्यूचे आणखी पाच बळी, मृत्यूसंख्या ७३
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
राजस्थानमध्ये स्वाईन फ्ल्यूचे आणखी पाच बळी, मृत्युसंख्या ७३
राजस्थानमध्ये स्वाईन फ्ल्यूचे आणखी पाच बळी, मृत्यूसंख्या ७३
राजस्थानमध्ये स्वाईन फ्ल्यूचे आणखी पाच बळी, मृत्युसंख्या ७३ जयपूर : राजस्थानमध्ये स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या आणखी पाच रुग्णांचा शुक्रवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याबरोबरच राज्यात जानेवारी २०१५ पासून स्वाईन फ्ल्यूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून ७३ वर पोहोचली.अजमेर, बाडमेर, जोधपूर, बनसवाडा आणि चित्तोडगढ जिल्ह्यात प्रत्येकी एका स्वाईन फ्ल्यू रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याचे संचालक बी. आर. मीणा यांनी दिली. राज्यात १ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत एकूण ४९७ जणांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीत चाचणीत आढळून आले होते. त्यांपैकी ७३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, असे मीणा यांनी सांगितले.लखनौमध्ये आढळले स्वाईन फ्ल्यूचे ३१ रुग्णलखनौ : लखनौ येथे शुक्रवारी एका ५ वर्षांच्या मुलाला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आल्याने शहरात या जीवघेण्या रोगाची लागण झालेल्यांची संख्या वाढून ३१ वर पोहोचली आहे.सुयश शरण असे या मुलाचे नाव आहे. त्याला एच१एन१ विषाणूची लागण झाल्याचे चाचणीत आढळले. स्वाईन फ्ल्यू झालेल्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ९ जानेवारीला शहरात एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला होता. तर एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची पत्नी १३ जानेवारीला स्वाईन फ्ल्यूने दगावली होती. (वृत्तसंस्था)