शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 06:57 IST

Raja Raghuvanshi Murder Case: मेघालयात हनिमूनदरम्यान पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या त्याची पत्नी सोनम हिनेच हा गुन्हा केल्याची आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांवरून मला १०० टक्के खात्री झाली आहे. गुन्हा सिद्ध झाला तर तिला फाशी द्या अशी मागणी सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी यांनी बुधवारी केली.

शिलाँग - मेघालयात हनिमूनदरम्यान पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या त्याची पत्नी सोनम हिनेच हा गुन्हा केल्याची आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांवरून मला १०० टक्के खात्री झाली आहे. गुन्हा सिद्ध झाला तर तिला फाशी द्या अशी मागणी सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी यांनी बुधवारी केली. तिच्याशी माहेरच्या लोकांनी नातेसंबंध तोडले आहेत. सोनम रघुवंशी व तिच्या चार सहकाऱ्यांना शिलाँग येथील न्यायालयाने बुधवारी आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंद यांनी म्हटले आहे की, माझ्या बहिणीनेच राजा रघुवंशीची हत्या केली, याची आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांवरून मला १०० टक्के खात्री झाली आहे. तिच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला, तर तिला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशीही त्यांनी मागणी केली. सोनम आणि राजा यांचा विवाह ११ मे रोजी इंदूरमध्ये झाला होता आणि २० मे रोजी ते गुवाहाटीमार्गे मेघालयात पोहोचले. २ जून रोजी राजाचा मृतदेह वेसॉडोंग धबधब्याजवळील खोल दरीत आढळला. त्यानंतर सोनमचा शोध सुरू झाला.

शारीरिक संबंधाआधी देवीला नैवेद्य लागेल विवाहानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याआधी गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात जाऊन देवीला नैवेद्य अर्पण करावा लागेल, असे सोनमने आपला पती राजा रघुवंशीला सांगितले होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.हनिमूनसाठी फिरायला जाण्याचे ठरवल्यानंतर हत्या करण्याचा कट सोनम आणि तिच्या प्रियकराने रचला. मेघालयातील एकांत जागी राजाची हत्या करण्यात आली.जेव्हा सोनमला एसआयटीपुढे उभे करण्यात आले, तेव्हा ती रडू लागली. तिने प्रियकर राजच्या मदतीने हत्येची योजना आखल्याचेही कबूल केले. राजने याआधीच, म्हणजे एक दिवस आधीच, गुन्हा कबूल केला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश