शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

"जय श्रीराम" चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली नासधूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 12:14 IST

Demolished Toilet Complex : शौचालयाच्या जवळच बस स्टॉप असल्याने अनेक प्रवासी या शौचालयाचा वापर करत होते. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी "जय श्रीराम"ची घोषणा देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शौचालय मंदिराच्या भिंतीजवळ असल्याचं म्हणत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या शौचालयाची तोडफोड केली आहे. जवळपास 40 वर्षे जुनं असलेलं हे शौचालय मंदिराच्या भिंतीपासून काही फुटांच्या अंतरावर आहे. तसेच मंदिर आणि शौचालयादरम्यान एक छोटी गल्लीही आहे. शौचालयाच्या जवळच बस स्टॉप असल्याने अनेक प्रवासी या शौचालयाचा वापर करत होते. 

काही दिवसांपूर्वीच या शौचालयाच्या आधुनिकीकरणाचं कामही करण्यात आलं होतं. बुधवारी (20 जानेवारी)  दुपारच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम, जय श्रीराम', 'एक ही नारा एक ही नाम - जय श्रीराम जय श्रीराम' अशा घोषणा देत मोठ-मोठ्या हातोड्यांनी टॉयलेट कॉम्प्लेक्सवर घाव घाले आणि या शौचालयाची खूप तोडफोड केली. यामध्ये महिला आणि दिव्यांगासाठी बनवण्यात आलेल्या शौचालयाचाही समावेश असून त्याचंही नुकसान झालं आहे. 

अखिल भारत हिंदू महासभेचे पश्चिम उत्तर प्रदेश अध्यक्ष असल्याचं सांगत विष सिंह कंबोज हे या शौचालयावरील हल्ल्यांचं नेतृत्व करत होते. 'दोन दिवसांपूर्वी आमचे हिंदू योद्धे येथे आले होते. त्यांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र येथे कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे आम्हीच हे शौचालय हटवण्याचा निर्णय घेतला' अशी माहिती कंबोज यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना दिली आहे. 

शौचालय 40 वर्षे जुनं

शौचालयात साफसफाई सुपरवाजयर म्हणून काम करणाऱ्या विमला यांनी मात्र हे शौचालय 40 वर्षे जुनं असल्याचं म्हटलं आहे. मंदिर आणि शौचालयात अंतर आहे. मंदिर आणि शौचालया दरम्यान एक छोटा नालाही आहे. आम्ही त्यांना शौचालयाची नासधूस करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही आमचं ऐकलं नाही. या शौचालयाचा अनेक पुरुष, महिला, दिव्यांग वापर करतात, आता ते कुठे जाणार? असा प्रश्नही विमला यांनी विचारला आहे. तर शौचालयाची तोडफोड करणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असं प्रशासनानं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश