शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

'नीरी'च्या वैज्ञानिकांचं संशोधन लय भारी; आता रस्त्यातच मुरणार पावसाचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:19 IST

‘फ्लाय अ‍ॅश’द्वारे काँक्रिटची निर्मिती

- निशांत वानखेडे नागपूर : रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता रस्त्यातच शोषले जाऊन झिरपत जमिनीत मुरवण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. अशात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) वैज्ञानिकांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. वीज प्रकल्पातील राखेपासून (फ्लाय अ‍ॅश) रस्ते निर्मितीसाठी उपयोगी काँक्रिट तयार करण्याचे तंत्रज्ञान नीरीने विकसित केले आहे. यातून मजबूत रस्ते तयार करण्यासोबतच भूगर्भातील जलस्तर वाढेल, असा दावा त्यांनी केला आहे.कोळशावरील विद्युत प्रकल्पातून निघणारी राख व त्यातून होणारे प्रदूषणाची जीवघेणे ठरत आहेत. ही राख पोरस काँक्रिट म्हणून उपयोगात येऊ शकते का, यावरही संशोधन सुरु आहे. बांधकामाच्या विटा व इतर वस्तू निर्मितीच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नव्हते. त्यात सिमेंटसारखी मजबुती येत नव्हती. नीरीचे प्रधान वैज्ञानिक आणि या प्रकल्पाचे संयोजक डॉ. अवनीश अंशुल यांनी या ‘फ्लाय अ‍ॅश बेस्ड हाय स्ट्रेन्थ परवियस काँक्रिट’ विषयी माहिती दिली.आतापर्यंत फ्लायअ‍ॅशमध्ये अल्कलीच्या मिश्रणाचा प्रयत्न चालला होता. पण अल्कली धोकादायक असल्याने व्यावसायिक वापर शक्य झाला नाही. रस्ते निर्मितीसाठी काँक्रिटची क्षमता ३० मेगापिक्सलपर्यंत असणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत ही क्षमता १८ मेगापिक्सलच्यावर आणणे शक्य झाले नाही. मात्र नीरीमध्ये वेगवेगळ्या कंपोनन्टचा उपयोग करून स्मार्ट जीओ पॉलिमर तंत्राने यापेक्षा अधिक क्षमतेचे पोरस काँक्रिट तयार केल्याचे त्यांनी सांगितले.सात दिवसांत रस्ता उपयोगासाठी तयारनीरीमध्ये या पोरस काँक्रिटचा वापर करून एक मोठे स्ट्रक्चर तयार करण्यात आले असून ते यशस्वीपणे कार्य करीत असल्याचे डॉ. अंशुल यांनी सांगितले. यात सिमेंटपेक्षा चांगली गुणवत्ता आहे. नवनिर्मितीनंतर सिमेंट रस्त्यांच्या मजबुतीसाठी २८ दिवस वाट पहावी लागते व भरपूर पाणी द्यावे लागते. मात्र फ्लाय अ‍ॅशच्या पोरस काँक्रिटवर पाणी टाकण्याची गरज नाही व सात दिवसांत रस्ता उपयोगासाठी तयार होतो.