पाऊस.. तीन
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
कोदामेंढी
पाऊस.. तीन
कोदामेंढीपरिसरात अचानक बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. शेतातील गहू अक्षरश: झोपला. शिवाय अन्य पिकांचीही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. या अवकाळी पावसामुळे परिसरातील विटाभट्ट्यांचे नुकसान झाले. राईस मिलच्या आवारात असलेल्या धानाच्या पोत्यांवर पाऊस बरसल्याने धान ओला झाला. या वर्षी धानाला भाव नसल्याने व तांदळाला मागणी नसल्याने राईस मिलांच्या आवारात मोठ्या प्रमाणात धानाची पोती ठेवली होती. एकीकडे तांदूळ, धानाला मागणी नाही तर खरेदी करून ठेवलेला धान खराब झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. ......विटाभट्ट्यांचे नुकसानकोदामेंढी, खात या परिसरात विटांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जातो. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे विटाभट्ट्यांचे नुकसान झाले. जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने विटा भिजल्या यात वीटभट्टी मालकांना आर्थिक फटका बसला आहे. .....पिकांचे सर्व्हेक्षण कराबुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील मौदा, भिवापूर, कळमेश्वर, सावनेर, रामटेक, पारशिवनी या तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने पिकांचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.