शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

स्टीलच्या कचऱ्यापासून बनविणार पावसात खराब न होणारे रस्ते, अरुणाचल प्रदेशमध्ये टाकाऊपासून टिकावूचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 08:53 IST

सीमा रस्ते संघटना (बीआरओ) अरुणाचल प्रदेशातील मुसळधार पावसाच्या क्षेत्रात (अतिवृष्टीप्रवण भाग) असाच एक रस्ता बांधत आहे. असाच प्रयोग गुजरातमधील हजीरा येथे यापूर्वीच यशस्वी झाला आहे. 

- शरद गुप्ता

नवी दिल्ली : आता मुसळधार पाऊस किंवा पुरामुळे रस्ते खराब होणार नाहीत. कारण ते आता खडी, वाळूऐवजी स्टीलच्या (पोलाद) कचऱ्यापासून बनवण्यात येणार आहेत. सीमा रस्ते संघटना (बीआरओ) अरुणाचल प्रदेशातील मुसळधार पावसाच्या क्षेत्रात (अतिवृष्टीप्रवण भाग) असाच एक रस्ता बांधत आहे. असाच प्रयोग गुजरातमधील हजीरा येथे यापूर्वीच यशस्वी झाला आहे. 

केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेने (सीआरआरआय) काही मुख्य स्टील उत्पादक कंपन्या आणि पोलाद मंत्रालयाच्या मदतीने हजीरा येथे १.१ किलोमीटरचा रस्ता स्टील स्लॅगपासून (लोखंड खनिजाची मळी) बनवला आहे. लोह खनिजापासून स्टील बनवल्यानंतर उरलेल्या टाकाऊ पदार्थाला  स्लॅग (मळी) म्हणतात. सीआरआरआयने रस्तेबांधणीत वाळू आणि खडीच्या जागी या कचऱ्याचा वापर केला आहे. स्टील स्लॅगपासून बनवण्यात येणारा रस्ता सामान्य रस्त्याच्या तुलनेत अनेक पटीने अधिक मजबूत असल्याचे सिद्ध होत आहे. 

एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदआता या कचऱ्याचा उपयोग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (न्हाई) बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांतही करण्यात येईल. तसेच रेल्वे रुळाच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या खडीच्या ठिकाणीही याचा वापर करण्याची योजना आहे. या तंत्रज्ञानाचा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही समावेश करण्यात आला. 

अतिरिक्त कमाईचा मार्ग- केवळ सरकारी पोलाद कंपन्यांतच जवळपास १०० एकर जमिनीचा वापर या स्लॅगच्या साठवणुकीसाठी केला जात होता. - खासगी कंपन्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन नाही. त्यामुळे त्या जागा किरायाने घेऊन स्टीलच्या कचऱ्याची साठवणूक करत होत्या. -  मात्र, सीआरआरआयने शोधलेल्या तंत्रज्ञानाद्वारे या कचऱ्यातून २३ टक्के स्टील काढणे शक्य झाले असून, सोबतच उरलेल्या कचऱ्याचादेखील उपयोग होऊ लागल्याने अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे, असे पांडे यांनी सांगितले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक