शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

रेल्वेचे Rail SAARTHI अॅप लॉन्च

By admin | Updated: July 14, 2017 21:27 IST

रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आता प्रवाशांच्या समस्या किंवा अडचणी दूर करण्यासाठी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आता प्रवाशांच्या समस्या किंवा अडचणी दूर करण्यासाठी रेल्वेकडून एक मोबाईल अॅप सुरु करण्यात आले आहे.  रेल सारथी (Rail SAARTHI) असे या अॅपचे नाव असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुक्रवारी या अॅपचे लॉंचिग करण्यात आले. 
रेल सारथी या अॅपच्या माध्यमातून आता प्रवाशांना रेल्वे प्रवासासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहे. याआधी एखाद्या प्रवाश्याला रेल्वेसंबंधी तक्रार करायची असल्यास अनेक अडचणी येत होत्या. ही तक्रार कोणाकडे आणि कशी करावी. तसेच, तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते, यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र आता तसे होणार नाही कारण, रेल सारथी या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे.  याचबरोबर, या मोबाईल अॅपवरुन रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकिट बुकींग करता येते. तसेच, प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांची ऑर्डर, रेल्वेचे टाईम टेबल आणि विशेष म्हणजे रेल्वेचे लोकेशन सुद्धा या अॅपमधून पाहता येणार आहे. रेल्वेच्या आगमन आणि प्रस्थानाची वेळ, प्लॅटफॉर्म नंबर, ट्रेनला होणारा उशीर, रद्द गाड्या, आसन व्यवस्था यांची माहितीही मिळणार आहे.
(रेल्वे आणणार मेगा अॅप! सर्व माहिती मिळणार एका क्लिकवर) 
(रेल्वे अॅपवरून करता येणार विमानाचं तिकीट बुकिंग)
त्यासोबतच या अॅपवरून टॅक्सी, पोर्टस सर्व्हिस, रिटायरिंग रूम हॉटेल, टूर पॅकेज, ई कॅटरिंग आदींचे बुकिंग करता येणार आहे. रेल्वे या सेवा, संबंधित आस्थापनांशी मिळकत वाटणीच्या मॉडेलच्या आधारावर उपलब्ध करून देईल. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून रेल्वेला दरवर्षी किमान 100 कोटी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे.  
दरम्यान, रेल सारथी अॅप लॉन्च करताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी सरकारकडून अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु आहे. तसेच, रेल सारथी या अॅपच्या माध्यमातून रेल्वेच्या सेवा सुविधेबाबत प्रवाशांनी प्रतिक्रिया पाठवाव्यात.