शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

Railway Recruitment : रेल्वेमध्ये परीक्षेविना होतेय १००४ पदांची भरती, दहावी पास उमेदवारांना संधी

By बाळकृष्ण परब | Updated: January 5, 2021 14:07 IST

RRC Apprentice Recruitment: भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२१ असून, rrchubli.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात.

ठळक मुद्देदक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या एकूण १००४ पदांची भरती होणारया भरती प्रक्रियेसाठी २४ वर्षे एवढी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहेअर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय होणार आहे. ही निवडण शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर होईल

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या सुमारे १००४ पदांसाठी ही भरती निघाली असून, दहावी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२१ असून, rrchubli.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात.या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावीमध्ये किमान ५०० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, त्याशिवाय संबंधित ट्रेडमधील आयटीआयचा डिप्लोमा असणे आवश्य आहे.दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या एकूण १००४ पदांची भरती होणार आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील अप्रँटिसच्या पदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. यामध्ये हुबळी २८७, कॅरिएज रिपेअर वर्कशॉप हुबळी २१७, बंगळुरू डिव्हिजन २८०, म्हैसूर डिव्हिजन २८०, म्हैसूर डिव्हिजन १७७, सेंट्रल वर्कशॉप, म्हैसूर ४३ अशी पदे भरली जाणार आहेत.या भरती प्रक्रियेसाठी २४ वर्षे एवढी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी यांच्याशाठी १०० रुपये एवढे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. तर आरक्षित वर्ग आणि महिलांसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय होणार आहे. ही निवडण शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर होईल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेgovernment jobs updateसरकारी नोकरी