शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळाशेजारील 48 हजार झोपडपट्ट्यांना कोर्टाची नोटीस, 14 सप्टेंबरपर्यंत रिकामी करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 15:45 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली: रेल्वेने ट्रॅकच्या बाजूला असलेल्या 48 हजार झोपडपट्ट्यांना नोटीस बजावण्यात आली असून, 14 सप्टेंबरपर्यंत जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. एनसीआरमधील सुमारे 48,000 झोपडपट्टी तीन महिन्यांत हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता रेल्वेने दिल्ली भागातील झोपडपट्ट्यांवर नोटीस चिकटवली आहे. झोपडपट्टी रिकामी करण्यासाठी ही नोटीस जारी केली गेली आहे. नोटिशीनुसार 14 सप्टेंबरपर्यंत झोपडपट्ट्या रिकामी करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अलीकडील आदेशात म्हटले होते की, दिल्ली-एनसीआरमध्ये सुमारे 140 किलोमीटर लांबीच्या रेल्वे रुळांलगत तयार केलेल्या झोपडपट्ट्या हटवाव्यात. झोपडपट्टी हटविण्यावर कोणताही न्यायालय स्थगिती देणार नाही, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. माजी ज्येष्ठ न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिलेल्या निर्देशांना आव्हान देत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने दिल्लीतील सुमारे 48,000 झोपडपट्ट्यांसह काही रेल्वे ट्रॅक हटविण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.कोणाच्या याचिकेवर निर्णय देण्यात आला?2018मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानेही रेल्वे ट्रॅकच्या सेफ्टी झोनमधून झोपडपट्ट्यांना हटविण्याचा आदेश जारी केला होता. त्या काळात बरीच राजकीय नाटकं झाली आणि सर्व राजकीय पक्ष झोपडपट्टीवासीयांच्या समर्थनार्थ बाहेर पडले. यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. एमसी मेहता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला असून, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1985 पासून दिल्ली व आसपासच्या प्रदूषणाशी संबंधित मुद्द्यांबाबत वेळोवेळी आदेश जारी केले जात आहेत.झोपडपट्टीसंदर्भात भारतीय रेल्वेने न्यायालयात 'या' गोष्टी सांगितल्याभारतीय रेल्वेने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, दिल्ली-एनसीआरमध्ये 140 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर झोपडपट्टीवासीयांचे अतिक्रमण आहे, त्यापैकी 70 किमी लाईनच्या बाजूने आहेत. येथे सुमारे 48000 झोपडपट्ट्या आहेत. रेल्वेने म्हटले आहे की, एनजीटीने ऑक्टोबर 2018 मध्ये आदेश दिले होते, ज्या अंतर्गत या झोपडपट्ट्यांना हटवण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली गेली.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी