शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे बजेट - Top 20 Points

By admin | Updated: February 26, 2015 15:03 IST

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या रेल्वे बजेटमधले महत्त्वाचे २० मुद्दे...

- सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देणारी बाब म्हणजे भाडेवाढ केलेली नाही.

- महिलांच्या सुरक्षेसाठी निवडक मार्गांवरील लेडीज डब्ब्यांमध्ये कॅमेरे बसवणार.
- कोकण रेल्वेवर ३ वर्षांत ५०,००० जणांना रोजगार मिळणार.
- ४०० रेल्वे स्टेशनांमध्ये वाय-फाय सेवा देणार.
- दरवर्षी अपघातांमुळे शेकडोंचा बळी घेणारी ३,४३८ मानवरहित फाटकं हद्दपार करणार, त्यासाठी लागणा-या पुलांसाठी ६,५८१ कोटी रुपयांची तरतूद.
- लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील जनरल डब्ब्यांमध्येही मोबाईल चार्जिंगची सुविधा.
- बड्या १० शहरांमधील रेल्वे स्थानके सॅटेलाईट टर्मिनल बनवणार.
- जनरल डब्यांची संख्या वाढवणार.
- गाड्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा प्रवाशांना एसएमएस द्वारे कळवणार.
- प्रवासाचा वेळ २० टक्क्यांनी कमी करणार.
- बंदरांना जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करणार ज्याचा महाराष्ट्रातल्या दिघीसारख्या बंदरांना फायदा. त्यासाठी २००० कोटी रुपयांची तरतूद.
- ९ हायस्पीड कॉरीडॉर.
- १७,००० प्रसाधनगृहे बायोटॉयलेट्समध्ये बदलणार.
- रेल्वेच्या जागांच्या वापरातून सौरउर्जा निर्माण करणार.
- खासगी कंपन्यांना पुढे येऊन रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याचे आवाहन.
- कायकल्प प्रकल्प, रेल्वेचा चेहरा मोहरा संपूर्णपणे बदलण्याचा पण प्रभूंनी केला आहे. कामाची पद्धत, निर्णयक्षमता, कामाचं वातावरण आणि प्रवाशांना चांगली सेवा देणारी संस्कृती रेल्वे कर्मचा-यांमध्ये रुजवणार.
- लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्यांसाठी १२० कोटी रुपयांचा निधी देणार.
- रेल्वेतून प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाइन व्हिलचेअर बुक करण्याची सुविधा देणार
- प्रवाशांसाठी १३८ ही हेल्पलाईन व सुरक्षाविषयक मदतीसाठी १८२ ही टोलफ्री सेवा.
- पूर्वोत्तर आणि जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे तयार करण्यास प्राधान्य.